एक्स्प्लोर

राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून बच्चू कडू यांचे नौटंकी आंदोलन : भाजप

राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून बच्चू कडू हे नौटंकी आंदोलन भूमिका घेत असल्याची टीका भाजपने केली आहे.

अमरावती : राज्यमंत्री बच्चू कडू हे हजारो शेतकऱ्यांना घेऊन दिल्लीतील किसान मोर्चाला समर्थन देण्यासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनाने मोर्चा घेऊन निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी आधी राज्यातील शेतकऱ्यांवर लक्ष द्यावे, अशी टीका भाजपने केली आहे. बच्चू कडू यांच्या या आंदोलनाला प्रतिउत्तर म्हणून गुरुकुंज मोझरीमध्ये आज भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता दिघडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. उद्या भाजप हे बच्चू कडू यांच्या बेलोरा गावात आंदोलन करणार आहेत.

राज्यमंत्री बच्चू कडू हे केंद्र सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांना भडकवीत असून महाराष्ट्र सरकाराने सत्तेत आल्यापासून कायम शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित ठेवले आहे. 25 हेक्टर मदत शेतकऱ्यांना देण्यात येणार होती. परंतु, मदत मिळाली नाही, दूध दरभाव वाढ देण्यात आली नाही. पावसामुळे विदर्भाचे प्रचंड नुकसान झाले असताना तुटपुंजी मदत देण्यात आली. तेव्हा राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून बच्चू कडू हे नौटंकी आंदोलन भूमिका घेत असल्याचं भाजपने म्हटले आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचा निषेध केला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही यावेळी करन्यात आली.

दहाव्या दिवशीही शेतकऱ्यांचं आंदोलन : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आज दहाव्या दिवशीही आंदोलन सुरुच आहे. शनिवारी केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेची पाचवी फेरी पार पडली. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी नवे कृषी कायदे मागे घ्यावे या आपल्या भूमिकेचं समर्थन करत जवळपास 'मौन व्रत' धारण केलं. सरकारनं हे कायदे मागे घेणार की नाही याचं उत्तर केवळ 'होय' की 'नाही' या शब्दांत द्यावं अशीही भूमिका शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी घेतली आहे.

पंजाब किसान युनियनचे नेते रुलधू सिंह यांनी सांगितलं की, "किसान युनियनच्या नेत्यांनी मौन व्रत धारण केलंय. सरकार हे कायदे मागे घेणार की नाही या प्रश्नाचं सरळ उत्तर देत नाही." पंजाब किसान युनियनचे कायदेशीर सल्लागार गुरलाभ सिंह महल यांनी सांगितलं की, "सरकार हे कायदे मागे घेणार की नाही याच उत्तर 'होय' किंवा 'नाही या शब्दात शेतकऱ्यांना उत्तर अपेक्षित आहे. शनिवारच्या पाचव्या फेरीच्या बैठकीत शेतकरी नेते आपल्या तोंडावर बोट ठेऊन होय की नाही असा फलक हातात घेऊन बसले होते."

Bacchu kadu | 'प्रहार' करण्यासाठी बच्चू कडू मध्य प्रदेशच्या बैतूलहून दिल्लीला रवाना

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil on Jayant Patil: जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
Maharashtra Live blog updates: नाशिक महापालिका महासभा आधीच ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक; सभागृहा बाहेर घोषणाबाजी
नाशिक महापालिका महासभा आधीच ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक; सभागृहा बाहेर घोषणाबाजी
Bogus Seeds News : राज्यभरात बोगस खत ,अन् निकृष्ठ बियाणांचा सुळसुळाट; आता फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन, नेमकं काय होणार?
राज्यभरात बोगस खत ,अन् निकृष्ठ बियाणांचा सुळसुळाट; आता फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन, नेमकं काय होणार?
Sanjay Raut on Jayant Patil Meet Eknath Shinde: जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला; म्हणाले...
जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला; म्हणाले...

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil on Jayant Patil: जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
Iran War Live Update: अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला
अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला
20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
Sunil Tatkare: जयंत पाटलांना अर्थखातं मिळण्याची चर्चा, एकनाथ शिंदे- जयंत पाटील भेटीवर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
जयंत पाटलांना अर्थखातं मिळण्याची चर्चा, एकनाथ शिंदे- जयंत पाटील भेटीवर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Tukaram Mundhe FDA Action Parsi Dairy Farm Mumbai News: तुकाराम मुंढेंची मुंबईतील 110 वर्षे जुन्या पारसी डेअरी फार्मवर कारवाई, परवानाच रद्द करुन टाकला, FDA ला धाड टाकताच काय काय दिसलं?
तुकाराम मुंढेंची मुंबईतील 110 वर्षे जुन्या पारसी डेअरी फार्मवर कारवाई, परवानाच रद्द करुन टाकला, FDA ला धाड टाकताच काय काय दिसलं?
Chhatrapati Sambhajinagar Crime: पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा घेतला बळी; छत्रपती संभाजीनगरच वाळूज हादरलं!
पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा बळी घेतला; छत्रपती संभाजीनगरच वाळूज हादरलं!
Crime news: छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकाऱ्याने महिलेसोबत नको ते केलं; शारीरिक जवळीक, ब्लॅकमेलिंगचा आरोप, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकाऱ्याने महिलेसोबत नको ते केलं; शारीरिक जवळीक, ब्लॅकमेलिंगचा आरोप, नेमकं काय घडलं?
Embed widget