एक्स्प्लोर

"उद्धवजी फोटोग्राफी करायचे तेव्हा देवेंद्रजी कारसेवक होते, सात जन्म झाले तरी फडणवीसांची बरोबरी करु शकणार नाहीत"

Chandrashekhar Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीकास्त्र सोडले.

Chandrashekhar Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीकास्त्र सोडले. "उद्धवजी फोटोग्राफी करायचे तेव्हा देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) कारसेवक होते, सात जन्म झाले तरी फडणवीसांची बरोबरी करु शकणार नाहीत, असा हल्लाबोल बावनकुळे यांनी केलाय. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. ज्यावेळी बाबरी पाडली होते, तेव्हा फडणवीसांचं वय काय होतं? असा टोला ठाकरेंनी लागवला होता. त्याला बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलेय. 

फडणवीसांची बरोबरी करु शकणार नाहीत - 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की," उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस समजलेच नाहीत. माझा त्यांचा 35 वर्षांचा संबंध आहे. उद्धव ठाकरे फोटोग्राफी करायचे तेव्हा देवेंद्र फडणवीस कारसेवक होते. सात जन्म जरी उद्धव ठाकरेंनी घेतले तरी फडणवीसांची बरोबरी करु शकत नाहीत"

अटलजींचा फोटो कुठे? ठाकरेंच्या आरोपाला उत्तर - 

उद्धव ठाकरे यांनी कालची (शुक्रवार) चित्रफीत नीट पाहिली नाही. अटल सेतूचं लोकार्पण करताना सर्वत्र बॅनरवर, जाहिरातीत अटलजींचा फोटो होता. मी नेहमीच म्हणतो उद्धव ठाकरे मिडियासमोर येऊन नॅरेटीव्ह सेट करतात. मोदी यांना जगातला सर्वोत्तम नेता असं जग म्हणतं. पण मोदी यांना महान म्हणायचं फक्त पाकिस्तान आणि उद्धव ठाकरेच राहीले आहेत, असा हल्लाबोल बावनकुळे यांनी केला.  

उद्धव ठाकरेंना टोला - 

काळाराम मंदिरात पुजा करण्याचा त्यांचा अधिकार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नपुर्तीचा 22 जानेवारी हा दिवस आहे. बाळासाहेबवरुन बघत असतील, माझा उद्धव अयोध्येत का जात नाही. कशाची अॅलर्जी माझ्या उद्धवला झाली असं ते बोलतील, असे बावनकुळे म्हणाले. 

स्टॅलीनचा मुलगा म्हटला होता की हिंदू धर्म संपवू. अशा सोबत उद्धव जी राहतात. मोदीजी किती घरंदाज आहेत, हे 2024 ला दिसेल. उरणमध्ये 90 हजार महिला मोदींना नमस्कार करायला आल्या होत्या, असेही बावनकुळे म्हणाले. मोदीजीच्या वादळात महाविकास आघाडी झाड-पत्यांसारखी उडून जाईल, असा टोलाही यावेळी बावनकुळे यांनी लगावला.

 मुंबईतील ठेवीवर काय म्हणाले ?

ठेवी विकासासाठी खर्च करावे. सरकार डिपॅाझीट करण्यासाठी नाही. जनतेच्या हितासाठी खर्च करणे ही सरकारची जबाबदारी आहे. अटल सेतुमुळे इंधनाची मोठी बचत होणार, हे पर्यावरण हिताचे आहे, असे बावनकुळे यांनी सांगितलं. 

इनकमिंग मोठं असेल - 

पुढच्या काळात महायुतीत येणाऱ्यांची मोठी रांग आहे. शिंदे, अजितदादा, आमच्याकडे येणाऱ्यांची मोठी संख्या असेल, असे बावनकुळे यांनी सांगितलं. 

भंडारा गोंदिया जागा पवार गट सोडणार

जागावाटपाबाबत केंद्रीय पार्लीयामेंट्री बोर्ड ठरवेल. जी जागा ज्याला मिळेल ती आम्ही निवडून आणू. महाविकास आघाडीत उद्धव जी दोन जागा मिळाल्या तरी ते राहतील. ते मजबूर आहेत. येत्या काळात शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची वाईट स्थिती होईल. त्यांना उमेदवारंही मिळणार नाही, असे बावनकुळे यांनी सांगितलं. 

अयोध्या निमंत्रणावर काय म्हणाले ?

 उद्धव ठाकरे यांना निमंत्रण आहे. त्यांनी जायला हवे.. त्यांची काय भावना आहे, माहीत नाही. पण देशाची भावना आहे. देशातील बच्चा बच्चा म्हणतोय. मोदीजींच्या हातून प्राणप्रतिष्ठा होतेय, असे बावनकुळे म्हणाले. खासदार, आमदारांनी सुचना  करण्याची गरज नाही. प्रत्येकजण कार्यक्रम करणार, असेही बावनकुळे म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही, संशय आल्यास ग्राहकांनी थेट टोल फ्री क्रमांकर तक्रार करावी : तुकाराम मुंढे
नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही, संशय आल्यास ग्राहकांनी थेट टोल फ्री क्रमांकर तक्रार करावी : तुकाराम मुंढे

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
Embed widget