Eknath Shinde: मातोश्री अन् आदित्य ठाकरे निकटवर्तीयाकडे एकनाथ शिंदेंनी दिली सर्वात मोठी जबाबदारी; निवडणुकीपुर्वी ठाकरेंना मोठा धक्का
Eknath Shinde: उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना जोरदार धक्का दिला आहे. आधी मातोश्री आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असणाऱ्या व्यक्तीकडे शिवसेना (शिंदे गट) पक्षाने सर्वात महत्वाची जबाबदारी दिली आहे.
Eknath Shinde: शिवसेना पक्षफुटीनंतर इतक्या महिन्यानंतरही अद्याप पक्षातील नेत्यांचं पक्षांतर सुरूच असल्याचं चित्र आहे. अशातच आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना जोरदार धक्का दिला आहे. आधी मातोश्री आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असणाऱ्या व्यक्तीकडे शिवसेना (शिंदे गट) पक्षाने सर्वात महत्वाची जबाबदारी दिली आहे. बॅालिवूड आणि क्रिकेट जगतात प्रसिद्ध असणाऱ्या राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या खांद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी आणि मोठी जबाबदारी दिली आहे. ते आता शिंदे सेनेच्या सोशल मीडियाचा राज्यप्रमुख झाले आहे. (Rahul Kanal appointed As Social Media Chief Of Eknath Shinde Shiv Sena)
बॅालिवूड आणि क्रिकेट जगतात प्रसिद्ध असणाऱ्या राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या खांद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी नवी जबाबदारी दिली आहे, सलमान खान, संजय दत्त विराट कोहली सुर्यकुमार यादव यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांच्या सोशल मीडियावर फेमस असणाऱ्या राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्यावर आता शिवसेनेच्या सोशल मीडियाच्या राज्यप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे, गेली अनेक वर्ष राहुल कनाल हे राजकीय, बॅालिवूड आणि क्रिकेट जगतातल्या लोकांसाठी काम करत आहे, आय लव्ह मुंबईच्या माध्यामातून राहुल कनाल यांनी मुंबईच नव्हे तर भारतभर काम केलं आहे.
मुक्या प्राण्यांना अन्नदानापासून ते त्यांना राहण्याची व्यवस्था राहुल कनाल (Rahul Kanal) यांनी केली आहे, कोरोना काळात कनाल यांनी केलेल्या कामांची पोचपावती अनेक वेळा सोशल मीडियांच्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटींनी दिलेली आहे. आता विधानसभेच्या तोंडावर राहुल कनाल यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे, एकेकाळी आदित्य ठाकरेंच्या जवळचे व मातोश्रीचे निकटवर्तीय राहुल कनाल यांना मानलं जायचं त्यामुळे सोशल मीडियाच्या प्रमुखपदी आल्यानंतर राहुल काही मोठे गौप्यस्फोट करणार का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
अभिनेत्यांपासून ते क्रिकेट जगतात मोठी छाप
राहुल कनाल यांची अभिनेता सलमान खान, संजय दत्त, विराट कोहली, सुर्यकुमार यादव यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांच्या सोशल मीडियावर छाप आहे. गेली अनेक वर्षे राहुल कनाल राजकीय, बॅालिवूड आणि क्रिकेट जगतातल्या लोकांसाठी काम करत आहे. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.