एक्स्प्लोर
भाजप दंगली घडवणारं सरकार : प्रकाश आंबेडकर
बीडमध्ये वंचित बहुजन विकास आघाडीच्यावतीने सत्ता निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला प्रकाश आंबेडकर यांच्यासह ओबीसी नेते लक्ष्मण माने आणि एमआयएमचे पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला.
बीड : भाजप सरकार दंगली घडवणारं सरकार आहे, अशा शद्बात भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर टीका केली. बीडमध्ये वंचित बहुजन विकास आघाडीच्यावतीने सत्ता निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला प्रकाश आंबेडकर यांच्यासह ओबीसी नेते लक्ष्मण माने आणि एमआयएमचे पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला.
भाजप आणि आरएसएसचा इतिहास हा दंगली घडवण्याचा इतिहास आहे. हे दंगली घडवणारं सरकार असून या सरकारला देशातील जनतेची चिंता नाही. दुष्काळामुळे सध्या राज्यात गंभीर स्थिती निर्माण झालेली असताना हे सरकार दुष्काळग्रस्त भागात कोणत्याही उपाययोजना करत नाहीये. त्यामुळे सरकारला सत्तेतून खाली खेचण्याचं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं. महाराष्ट्रातील सरकार भ्रष्टाचार विरोधी सरकार आहे म्हणून सांगितल जातं. मात्र भाजप सरकारने भ्रष्टाचाराच्या नावावर 41 योजना बंद केल्या. आजाऱ्याल्या बरा करण्यापेक्षा त्या आजाराला फाशी देणारा हे सरकार आहे, असंही ते म्हणाले.
नोटाबंदीत भाजपने पैसा कमावला
मोदींनी नोटबंदी केली आणि त्यात मोठ्या प्रमाणात पैसा कमावला. तोच पैसा जनतेची मतं विकत घेण्यासाठी आता भाजप सरकार वापरत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. नोटाबंदीमुळे पाच कोटींहून अधिक बेरोजगार झाले. आजही त्यांना रोजगार नाही, मिळेल ते काम करतात. म्हणून मोदींना आणि आरएसएसला विचारा की चाललेला गाडा बिघडवलात का? आता देशात शांतता आणि संविधानाच्या रक्षणासाठी वंचित विकास आघाडीला येत्या काळात निवडून द्या, असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.
साखर शाळा बंद केल्या
बीड जिल्हा मागील तीस वर्षांपासून ऊसतोड कामगार म्हणून ओळखला जातो. येथील कामगार मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात जातो. कामगाराची पुढची पिढी ऊसतोड कामगार होऊ नये म्हणून, कामगार आहे तिथे साखर शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ऊसतोड कामगारांचे मुलं शिकू लागले, चांगलं काम करु लागले. मात्र ज्यावेळी कामगार कमी होत आहेत हे लक्षात आलं त्यावेळी चालू केलेल्या साखर शाळा आणि प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्या, असं प्रकाश आंबेडकर यांनी आरोप केला.
काँग्रेस- राष्ट्रवादीवर घणाघात
एका देशामध्ये एक घटना मानणारी आणि एक न मानणारी अशी व्यवस्था चालू देणार नाही.एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाले म्हणतात की आम्ही भारताचं संविधान मान्य करणार नाही. दुसरीकडे आम्ही तुम्हाला संविधान मानायला लावू, असं म्हणण्याची ताकद काँग्रेस- राष्ट्रवादीमध्ये नाही, अशी घणाघाती टीका प्रकाश आंबेडकरांनी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement