(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhandardara: भंडारदरा नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज; 'या' खास सुविधा
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी (New Year Celebretion) अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण (Akole Bhandardara Dam)परिसर सज्ज झाला आहे.
Bhandardara Picnic Spot: सध्या सगळीकडे नवीन वर्षाच्या स्वागताची (New Year Celebretion) जय्यत तयारी सुरु आहे. थर्टी फस्ट सेलिब्रेट करण्यासाठी आपल्या जवळच्या पर्यटनस्थळाकडे जाण्यावर लोकांचा भर असतो. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी (New Year Celebretion) अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण (Akole Bhandardara Dam)परिसर सज्ज झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना निर्बंधांमुळे (Corona Virus Update) पर्यटकांना नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात करता आलं नाही. मात्र यावर्षी कोरोना निर्बंध हटल्याने भंडारदरा धरण परिसरात (Bhandaradara Dharan) आदिवासी तरुणांनी मोठी तयारी केली आहे.
भंडारदऱ्यामध्ये टेन्ट सिटीसह बोटिंगची व्यवस्था यावेळी करण्यात आली आहे. तर आलेल्या पर्यटकांना चांगली सुविधा मिळावी यासाठी वनविभाग देखील सज्ज झाला आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या पर्यटकांना या ठिकाणी आदिवासी नृत्याचाही आनंद घेता येईल.
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण हे नेहमीच पर्यटकांचे आकर्षण
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण हे नेहमीच पर्यटकांचे आकर्षण राहिलाय पावसाळ्यात दररोज हजारो पर्यटक या ठिकाणी हजेरी लावतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना निर्बंध असल्याने पर्यटकांना पर्यटनस्थळी जाता आलं नाही. मात्र यावर्षी कोरोना निर्बंध नसल्याने पर्यटनस्थळांना आता पर्यटकांनी विशेष पसंती दिली आहे. 2022 ला निरोप आणि 2023 चा स्वागत करण्यासाठी पर्यटन स्थळ हाऊसफुल झाली आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी आदिवासी तरुणांना मोठा रोजगार मिळाला आहे.
टेन्ट सिटी अनेक ठिकाणी उभारण्यात आल्या आहेत. तर धरणाच्या पाण्यात बोटिंगची व्यवस्था ही करण्यात आली आहे. दहा हजाराहून अधिक पर्यटक राहतील, अशी त्यांची निर्मिती धरण परिसरात करण्यात आली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या जलाशयाजवळच हे टेन्ट उभारण्यात आलेत.
भंडारदरा परिसरातील सर्व हॉटेल्स बुकिंग जवळपास फुल्ल
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर भंडारदरा परिसरातील सर्व हॉटेल्स बुकिंग जवळपास फुल्ल झाला आहे तर येणाऱ्या पर्यटकांच्या सुविधा होऊ नये यासाठी त्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यात आली आहे.
हरिश्चंद्रगडावर जाण्यास रात्रीच्या वेळी बंदी
यावर्षी हरिश्चंद्रगडावर जाण्यास रात्रीच्या वेळी बंदी घालण्यात आली आहे. मात्र भंडारदरा धरण परिसरातील इतर ठिकाणी मात्र पर्यटकांची मोठी गर्दी राहील आणि निश्चितच दोन वर्षानंतर पर्यटकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे आदिवासी तरुणांना रोजगार मिळेल आणि त्यांचा आर्थिक चक्रही सुरळीत होईल याच शंका नाही.
ही बातमी देखील वाचा