एक्स्प्लोर
भंडारा-गोंदियात सर्व ठिकाणी मतदान सुरु: काळे
भंडारा आणि गोंदियात तर तब्बल 450 इव्हीएम बंद असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
भंडारा: पालघर आणि भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएम मशीन बंद पडल्याची अनेक प्रकरणं पुढे आली आहेत.
भंडारा आणि गोंदियात तर तब्बल 450 इव्हीएम बंद असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
इव्हीएम बंद असल्यामुळे अनेक ठिकाणी मतदारांना ताटकळत राहावं लागत आहे. सातत्याने येणाऱ्या तक्रारीमुळे, गोंदियातील 35 केंद्रांवरील मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचं वृत्त आलं. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ते वृत्त फेटाळलं.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
दरम्यान, 35 केंद्रावरील मतदान रद्द केल्याची माहिती आल्यानंतर, त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांनी स्पष्टीकरण देत, कुठेही मतदान रद्द झालं नसल्याचं सांगितलं.
शेवटचा मतदार मतदान करेपर्यंत मतदानप्रक्रिया सुरुच राहील, असं अभिमन्यू काळे यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीचा आक्षेप
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनीही आक्षेप घेतला असून, ते पत्रकार परिषद घेऊन आपलं म्हणणं मांडणार आहेत.
भंडारा - गोंदिया मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 13.90 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी 12 डिसेंबर 2017 रोजी राजीनामा दिला होता. 14 डिसेंबर 2017 रोजी त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.
राष्ट्रवादी आणि काँग्रेस या ठिकाणी एकत्र लढत असून राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे उमेदवार आहेत. तर भाजपकडून हेमंत पटले मैदानात आहेत.
भाजपचे हेमंत पटले हे माजी आमदार आहेत, तर राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे तीन वेळा आमदार राहिले आहेत. एकूण 18 उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत भाजप आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीमध्ये आहे.
पालघरमध्येही मतदान यंत्रात बिघाड
इकडे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतही अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मतदानासाठी जास्तीचा वेळ द्यावा अशी मागणी केली जात आहे.
पालघरमधील एका केंद्रावर तर सकाळी सव्वासातच्या सुमारास बंद पडलेलं ईव्हीएम दुपारी सव्वा बारा वाजले तरी दुरुस्त झालेलं नव्हतं. त्यामुळे पाच तासांपेक्षा जास्त वेळ मतदार ताटकळत उभे राहिले. तर अनेकजण मतदान न करताच माघारी परतले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement