एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तरुणीच्या ब्लॅकमेलिंगमुळे भय्यू महाराजांची आत्महत्या?
भय्यू महाराजांची दुसरी पत्नी डॉ. आयुषी शर्मा आणि पहिल्या पत्नीची कन्या कुहू यांनी पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी) हरीनारायणचारी मिश्र यांची भेट घेतली. भय्यू महाराजांचे दोन सेवक आणि एका तरुणीने ब्लॅकमेल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मुंबई : आध्यात्मिक गुरु भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणाला नवीन वळण लागण्याची चिन्हं आहेत. ब्लॅकमेलिंग करणाऱ्या एका तरुणीमुळे भय्यू महाराजांनी टोकाचं पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भय्यू महाराजांची दुसरी पत्नी डॉ. आयुषी शर्मा आणि पहिल्या पत्नीची कन्या कुहू यांनी पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी) हरीनारायणचारी मिश्र यांची भेट घेतली. भय्यू महाराजांचे दोन सेवक आणि एका तरुणीने ब्लॅकमेल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
भय्यू महाराजांनी 12 जून 2018 रोजी इंदूरमधील राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती. घरगुती वादातून भय्यू महाराजांनी आत्महत्या केल्याची चर्चा होती.
भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर सुसाईड नोट सापडली. त्याच्या दुसऱ्या पानावर 'माझ्या माघारी सर्व आर्थिक व्यवहार सेवक विनायकने पाहावा', असा उल्लेख आहे. भय्यू महाराजांचा कुटुंब-कबिला इतका मोठा असूनही, त्यांनी सुसाईड नोटमध्ये सर्व संपत्तीची जबाबदारी नोकराकडे का दिली, असा प्रश्न त्यावेळी अनेकांना पडला होता.
भय्यू महाराजांना पैसे, फ्लॅट आणि गाडीसाठी ब्लॅकमेलिंग केले जात असल्याचा दावाही आयुषी आणि कुहू यांनी केला आहे. ब्लॅकमेलिंगमुळे विवंचनेत असलेल्या भय्यू महाराजांनी आत्महत्या केल्याचा संशय दोघींनी व्यक्त केला आहे.
पोलिसांच्या ताब्यात असलेला पूर्वीचा ड्रायव्हर कैलास पाटीलला या कटकारस्थानाची माहिती होती. त्याने सेवक विनायक, शरद देशमुख आणि एका तरुणीने रचलेल्या षडयंत्राबाबत जबाब नोंदवला आहे. यानुसार कलम 164 अंतर्गत कारवाईची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
कलम 164 च का?
अनेक वेळा साक्षीदार पोलिसांसमोर दिलेला जबाब कोर्टात बदलतात. मात्र कलम 164 अंतर्गत नोंदवलेला जबाब बदलणं सहज शक्य नसतं. जबाब बदलल्यास साक्षीदाराला शिक्षा होऊ शकते.
कैलासचा जबाब काय?
'भय्यू महाराजांना गोळी झाडून आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं. फूटी कोठी भागात राहणारी तरुणी याची सूत्रधार आहे. ही तरुणी भय्यू महाराजांच्या दुसऱ्या लग्नापूर्वी त्यांची काळजी घेण्यासाठी येत असे. तिने महाराजांसोबत प्रेमसंबंध जुळवले आणि अश्लील व्हिडिओ तयार केला. डॉ. आयुषी शर्मांसोबत लग्नानंतर तिचं घरी येणं-जाणं बंद झालं. मात्र तिने हा व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी देत भय्यू महाराजांकडून दरमहा दीड लाख रुपये उकळण्यास सुरुवात केली. ब्लॅकमेलिंगमध्ये महाराजांचा खास सेवक विनायक दुधाळे आणि शेखरही सहभागी झाले. विनायकच्या माध्यमातूनच अनेकदा तरुणीशी संपर्क केला जात असे.' असा जबाब कैलासने दिल्याचं पोलिसांनी सांगितल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.
कोण आहे विनायक?
-विनायक दुधाळे हा मूळचा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील आहे
-विनायक नेहमी भय्यू महाराजांसोबतच असे
-भय्यू महाराजांच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत विनायक सहभागी असे
-विनायकचा शब्द हा भय्यू महाराजांच शब्द मानला जात असे.
संबंधित बातम्या
भय्यू महाराज यांची आत्महत्या, गोळी झाडून आयुष्य संपवलं
मासिक शिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आणि भय्यू महाराजांनी गोळी झाडली!
भय्यू महाराजांची सुसाईड नोट सापडली!
हे मृत्युंजय महादेवा, मी तुला शरण आलो आहे, भय्यू महाराजांचं शेवटचं ट्विट
नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत.. सर्वांशी सख्य, भय्यू महाराज कोण होते?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement