एक्स्प्लोर

Maharashtra Governor : महाराष्ट्राला नवे राज्यपाल कोण मिळणार? तीन नावांची जोरदार चर्चा 

Maharashtra Governor : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपणाला पुन्हा उत्तराखंडला जाण्याचा मानस असल्याचं सांगितलं.

Maharashtra Governor : राज्यपाल भगतसिंह कोशारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांचा कोणत्याही क्षणी केंद्राकडून राजीनामा घेतला जाऊ शकतो, त्यामुळे आता महाराष्ट्राला नवे राज्यपाल कोण मिळणार? याची चर्चा सुरू झाली आहे.  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपल्याला पुन्हा उत्तराखंडला जायचं आहे असा मानस व्यक्त केला. त्यानंतर आता कोणत्याही क्षणी महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एबीपी माझाला मिळालेल्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात नवे राज्यपाल येणार असून यासाठी तीन नावांची चर्चा आहे.  लवकरच नावाची घोषणा करण्यात येणार आहे. पाहूयात कोणत्या तीन नावांची चर्चा आहे.... 

सुमित्रा महाजन -

इंदूर नगरपालिकेत वरिष्ठ नगरसेवक ते केंद्रीय मंत्री असा राजकीय प्रवास सुमित्रा महाजन यांचा आहे. राजकीय करिअरच्या सरतेशेवटी त्यांनी लोकसभा अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. महाराष्ट्रातील चिपळूणमध्ये 12 एप्रिल 1943 मध्ये त्यांचा जन्म झाला. त्या सरकारच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित आहेत. लोकसभेत सलग आठ वेळा इंदुरचं प्रतिनिधित्व त्यांनी केले आहे. 

ओम माथुर -

1) राजस्थानमधील रहिवासी आणि माजी खासदार. 

2) राजस्थानचे माजी प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश प्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडली.

3) सध्या छत्तीसगढचे प्रभारी म्हणून जबाबदारी.

अमरिंदर सिंह 
 
1) अमरिंदर सिंह हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री आहेत. 

2) 2014 साली पंजाबमध्ये बडे काँग्रेस नेते निवडणूक लढणे टाळत असताना सिंह यांनी अरुण जेटली यांच्या विरोधात निवडणूक लढली होती आणि जिंकली देखील होती. 

३) 2017 साली सिंह यांच्या नेतृत्वात काँग्रेसने विधानसभा निवडणूक लढली होती यात 117 जागांपैकी 77 जागांवर विजय मिळवला होता.

४) 2019 मध्ये मोदी लाट असताना देखील पंजाबमध्ये फारसा फरक पडला नव्हता. 13 जागांपैकी 8 जागी काँग्रेस विजयी ठरली होती.

मागील काही दिवसांत विरोधकांनी राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर राज्यपाल हटावचा नारा दिला होता. मात्र सत्ताधारी गटाचा वाढता विरोध झुगारून कोश्यारी यांनांच पदावर कायम ठेवलं होतं. पण आता विरोध मावळला असताना राज्यपालानी राजीनाम्याची इच्छा थेट पंतप्रधानांकडे व्यक्त केली आणि पुन्हा राज्यपाल बदलांच्या चर्चांना तोंड फुटल्याचं पाहिला मिळालं. एकिकडे राज्यात राज्यपाल बदलाचे वारे पुन्हा वाहू लागल्यानंतर आता दुसरीकडे भाजपचे राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस देखील एका महत्त्वाच्या बैठकीसाठी अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे आता राज्यपाल बदलाचा संदेश राज्यात केव्हा येऊन धडकतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

आणखी वाचा :
राज्यपाल कोश्यारी महाराष्ट्रातून निघण्याच्या तयारीत! पण त्यांची 'ही' वादग्रस्त वक्तव्यं जनता कधीच विसरणार नाही

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
Embed widget