एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा रॅप साँगमधून, बीडच्या कलाकाराची निर्मिती
बीडच्या शैलेंद्र निसरगंध या कलाकाराने एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडणारं रॅप साँग तयार केलं आहे. सध्या सोशल मीडियात या गाण्याने मोठी धमाल उडवली आहे.
बीड : ऐन दिवाळीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढीच्या मागणीसाठी आंदोलन पुकारलं होतं. एसटीच्या पगारात घर खर्च चालवणं शक्य नसल्याने हे आंदोलन करण्यात आलं. याच धर्तीवर बीडच्या शैलेंद्र निसरगंध या कलाकाराने एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडणारं रॅप साँग तयार केलं आहे. सध्या सोशल मीडियात या गाण्याने मोठी धमाल उडवली आहे.
नुकत्याच झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जनतेची मोठी पंचाईत झाली होती. पण तरीही कर्मचाऱ्यांचा पगार आणि त्यांच्या कामाचे तास पाहून महाराष्ट्रातील जनतेने एकप्रकारे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला मूकपणे पाठिंबा दिला होता.
सद्यस्थितीत मिळणाऱ्या पगारात घर खर्च चालवणं मुश्किल असल्याने, एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनातून आपला रोष व्यक्त केला होता. पण निर्ढावलेल्या सरकारने जबाबदारी ढकलत हात वरत केले.
पण त्यांच्या व्यथा रॅप साँगच्या माध्यमातून मांडण्याचं काम शैलेंद्र निसरगंध या कलाकारानं केलं आहे. शैलेंद्रने या गाण्याच्या रचनेसह, सादरीकरण आणि संगीत संयोजनही केलं आहे.
गाणं पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
Advertisement