एक्स्प्लोर

Beed : व्वा रे पठ्ठे! यूट्युबच्या मदतीनं अभ्यास अन् नीट परीक्षेत मिळवलं मोठं यश; बीडच्या विनायकच्या संघर्षाची कहाणी

Beed News ambajogai : अंबाजोगाईच्या विनायक भोसले याच्या यशाचं कौतुक सध्या होतंय. कुठलीही शिकवणी न लावता केवळ यू ट्युबवर अभ्यासक्रमांचे व्हिडीओ पाहून विनायकने नीट परीक्षेत 595 गुण प्राप्त केले. 

Beed News : आयुष्यात ज्यांना आपले ध्येय गाठायचे असते ते वाटेत येणाऱ्या अडचणी संदर्भात तक्रारी करत बसत नाहीत तर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचतात. अशीच काहीशी यशोगाथा आहे अंबाजोगाईच्या विनायक भोसले याची.  कुठलीही शिकवणी न लावता केवळ यू ट्युबवरील अभ्यासक्रमांचे व्हिडीओ पाहून विनायक भोसले याने नीट परीक्षेत 595 गुण प्राप्त केले. 

आईच्या कष्टाचे चीज केले 
विनायक भोसले यांच्या वडिलांचे 2014 मध्ये अपघाती निधन झाले. तो मूळचा परळी तालुक्यातील सेलू या गावचा आहे. मात्र वडिलांच्या निधनानंतर त्याची आईनेच विनायकचे पालन पोषण केले. लोकांच्या घरात जुने भांडी करून आईने विनायकला शिकवले आणि विनायकने सुद्धा त्या आईच्या कष्टाचे चीज केले.

विनायकला एक भाऊ आणि एक बहीण आहे. वडिलांच्या अपघाती निधनानंतर विनायकच्या आईने शिक्षणासाठी अंबाजोगाई गाठले. मुलाच्या शिक्षणासाठी विनायकच्या आईने भांडी धुणी करायला सुरुवात केली आणि एका छोट्याशा रूममध्ये चार भावंडं अभ्यास करत मोठी झाली.

जनावरं राखण्याचं  कामही केलं

सुरुवातीच्या काळात विनायकची आई या सगळ्या मुलांना घेऊन माजलगावमध्ये गेली होती. मात्र माजलगावपेक्षा आंबेजोगाईचे शिक्षण चांगले आहे अशी माहिती मिळाल्याने केवळ मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी माजलगाव सोडले आणि आंबेजोगाईमध्ये आल्या. माजलगावमध्ये असताना विनायक सुद्धा जनावरे राखण्याचं काम करत होता. 

कोचिंग क्लासेस न लावता विनायकने केवळ यू ट्युबवर अभ्यासक्रमांचे व्हिडीओ पाहून हे यश मिळवलं आहे. विनायक भोसले याने नीट परीक्षेत 595 गुण प्राप्त केले आहेत. अंगी जिद्द आणि चिकाटी असेल तर आर्थिक स्थिती अडसर ठरत नाही, याचा प्रत्यय विनायक भोसले याने समाजासमोर ठेवला आहे.

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत विनायकने यश मिळवलं

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत विनायकने जिद्दीने यश संपादन केले. त्याच्या पुढील शिक्षणासाठी 'आधार माणुसकीचा'चे अध्यक्ष संतोष पवार, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे स्थानिक कार्यवाह विपीन क्षीरसागर, भारतीय जैन संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष धनराज सोळंकी, सेवानिवृत्त अभियंता परमेश्वर भिसे, सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी रवी लोमटे यांनी त्याच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Pune Startup Repose india: हॅलो... मी रतन टाटा बोलतोय! एका फोननं पुण्यातील जोडप्याचं नशीबच पालटलं; वाचा रतन टाटा आणि त्यांच्या भेटीचा रंजक किस्सा

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Maha Exit Poll : मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची पसंती कुणाला? #abpमाझाRajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोपVidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 21 Nov 24Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Embed widget