तुमचं पाच टक्केच बाहेर काढलंय, आणखी काढलं तर पंधराशे दिवस घरात लपून बसाल, शरद पवार गटाच्या नेत्याचा धनंजय मुंडेंना इशारा
धनंजय मुंडे (Dhananjay Munde) तुमचे केवळ पाच टक्के बाहेर काढले गेले आहे, आणखी काढले तर पंधराशे दिवस तुम्ही घरात लपून बसाल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शिवराज बांगर यांनी दिला.

Beed : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) तुमचे केवळ पाच टक्के बाहेर काढले गेले आहे, आणखी काढले तर पंधराशे दिवस तुम्ही घरात लपून बसाल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शिवराज बांगर (Shivraj Bangar) यांनी दिला. तुम्हाला अन्यायाची चीड आणि न्यायाची चाड असेल तर तुम्ही संतोष देशमुख हत्या प्रकरणावर (santosh deshmukh Murder case) बोललं पाहिजे होतं असेही ते म्हणाले. बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात धनंजय मुंडे बोलले त्यांचे अभिनंदन, मात्र संदीप क्षीरसागर यांच्या सीडीआरची मागणी करत असताना सरपंच देशमुख हत्यानंतर वाल्मीक कराड 21 दिवस कुणाच्या संपर्कात होता? याचे देखील सीडीआर बाहेर आले पाहिजेl, अशी मागणी शरद पवार गटाचे नेते शिवराज बांगर यांनी केली.
परळीतील सरपंच बापू आंधळे यांच्या खुनाचा कट कुठे शिजला? शिवराज बांगर यांचा मुंडेंना सवाल
परळीतील सरपंच बापू आंधळे यांच्या खुनाचा कट कुठे शिजला? करुणा मुंडे यांच्या गाडीत बंदूक कोणी ठेवली? त्यादरम्यानचे देखील सीडीआर तपासणे गरजेचे आहे असे शिवराज बांगर म्हणाले. धनंजय मुंडे यांना अन्यायाची चीड आणि न्यायाची चाड असेल तर सरपंच देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली पाहिजे होती. त्यांच्यावर जो अन्याय झाला त्याच्यावर बोललं पाहिजे होतं. मात्र केवळ तुम्ही मंत्रीपद गेल्याच्या नैराश्येतून बोलले असल्याचं बांगर यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे तुमचे केवळ पाच टक्के काढले गेले. आणखी काढले तर पंधराशे दिवस तुम्ही घरात लपून बसाल असा इशारा बांगर यांनी दिला.
21 दिवस वाल्मिक कराड कोणाच्या संपर्कात होता? शिवराज बांगर यांचा मुंडेंना सवाल
संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर तब्बल 21 दिवस वाल्मिक कराड कोणाच्या संपर्कात होता याचे सीडीआर बाहेर आले पाहिजेत अशी मागणी शिवराज बांगर यांनी केली. बापू आंधळे यांचाय खूनाचा कट कोणाच्या कार्यालयात रचला याचेही सीडीआर बाहेर आले पाहिजेत. महादेव मुंडे यांचा खून तहसील कार्यालयासमोर केला आहे. या खूनाला 20 महिने झाले तरी आरोपी अद्याप सापडले नाहीत. सर्वांना माहित आहे आरोपी कोण आहेत. त्या आरोपींचे आणि धनंजय मुंडे यांचे संबंध काय आहेत याचे देखील सीडीआर बाहेर आले पाहिजेत असे शिवराज बांगर म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
बीड जिल्ह्यातील एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये दोन शिक्षकांनी नीटच्या परिक्षेची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ आणि छेडछाड केल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे या दोन शिक्षकांचे नाव असून या दोन्ही शिक्षकांविरोधात पोस्को कायद्या अंतर्गत बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचे पडसाद आता संपूर्ण बीडमध्ये उमटत आहेत. बीड मधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाप्रकरणी आज बीड बंदची हाक देण्यात आली होती. मात्र आरोपी शिक्षकांना अटक झाल्यानं तूर्तास बंद स्थगित करण्यात आलाय. बीड न्यायालयाने दोन्ही शिक्षकांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणावरून माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आरोपी शिक्षक विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागर राईट हॅन्ड असल्याचा आरोप केलाय.
महत्वाच्या बातम्या:























