एक्स्प्लोर

भाऊ जिंकला, बहिण हरली, परळीत धनंजय मुंडेंचाच गुलाल, 'बहिणाबाई' पंकजा मुंडेंना पराभवाचा धक्का 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा आणि दसरा मेळाव्यानिमित्त झालेली गृहमंत्री अमित शाह यांची प्रचारसभा यांचाही विशेष परिणाम मतदारांवर झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. धनंजय मुंडे यांचा हा विजय जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा परिणाम करणारा आहे.

बीड : बीड जिल्ह्यातील परळीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मोठ्या प्रमाणावर भावनिक झालेल्या परळीच्या रणांगणात अखेर भावाने बहिणीचा पराभव केला आहे. राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला आहे. दरम्यान मतदारांनी दिलेला कौल मान्य असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. हा निकाल अनाकलनीय असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. कार्यकर्त्यांनी शांत राहावे असे आवाहन देखील पंकजा मुंडे यांनी केले आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विद्यमान ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु, धनंजय मुंडेंनी विजय मिळवत देत पंकजा मुंडेंना जोरदार धक्का दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा आणि दसरा मेळाव्यानिमित्त झालेली गृहमंत्री अमित शाह यांची प्रचारसभा यांचाही विशेष परिणाम मतदारांवर झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. धनंजय मुंडे यांचा हा विजय जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा परिणाम करणारा आहे. परळीत प्रचार अंतिम टप्प्यात आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या व्हिडीओसंदर्भात कथित आरोपानंतर सोशल मीडियावर मोठा गोंधळ पाहायला मिळाला होता.  पंकजा मुंडे यांनी यानंतर भावनिक होत आवाहन केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या विरोधात बीडमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र व्हिडीओ क्लिप माझ्या वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारी आहे, असा भावनिक खुलासा धनंजय मुंडे यांनी दिला होता. अशी क्लिप एडिट करणाऱ्यांनी किमान बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा तरी आदर ठेवावा, आपली निवडणूक विकास कार्यावर आहे, ती भावनिकतेवर घेऊन जाताना इतकी खालची पातळी गाठू नका ही कळकळीची विनंती आहे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले होते. परळी मतदार संघातील लढत लक्षवेधी झाली होती. आरोप प्रत्यारोप झाल्याने निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शेवटच्या प्रचार सभेत पंकजा मुंडे यांना भोवळ येऊन त्या खाली पडल्या होत्या. यानंतर त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियातून धनंजय मुंडे यांनी जे भाषण केले त्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केल्यानंतर गुन्हाही दाखल झाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
Beed Morcha : तुम्हाला पद कशाला, आमचे मुडदे पाडायला? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा; बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चात नेत्यांचा आक्रोश
तुम्हाला पद कशाला, आमचे मुडदे पाडायला? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा; बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चात नेत्यांचा आक्रोश
उर्मिला कोठारेच्या कारचा चुराडा, भीषण अपघाताचे फोटो
उर्मिला कोठारेच्या कारचा चुराडा, भीषण अपघाताचे फोटो
अजितदादा तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, संभाजीराजेंचा थेट प्रहार
अजितदादा तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, संभाजीराजेंचा थेट प्रहार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajiraje Speech Beed : हे छत्रपती घराणं बीडचं पालकत्व स्वीकारले, घणाघाती भाषणJitendra Awhad Speech: वाल्मिक रक्तपिपासू, नरभक्षक ;आकाचा बाप त्याला पहिलं मंत्रिमंडळातून हकला!ABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4PM 04 July 2023Navjot Singh Sidhu Speech Manmohan Singh : नवज्योतसिंग सिद्धूचं गाजलेलं भाषण पुन्हा व्हायरल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
Beed Morcha : तुम्हाला पद कशाला, आमचे मुडदे पाडायला? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा; बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चात नेत्यांचा आक्रोश
तुम्हाला पद कशाला, आमचे मुडदे पाडायला? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा; बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चात नेत्यांचा आक्रोश
उर्मिला कोठारेच्या कारचा चुराडा, भीषण अपघाताचे फोटो
उर्मिला कोठारेच्या कारचा चुराडा, भीषण अपघाताचे फोटो
अजितदादा तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, संभाजीराजेंचा थेट प्रहार
अजितदादा तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, संभाजीराजेंचा थेट प्रहार
Bajrang Sonwane : धनंजय मुंडे, बीड जिल्ह्यात तुमचा जन्म झाला असेल तर...; बजरंग बप्पांचा थेट हल्लाबोल, दलाल म्हणत निशाणा
धनंजय मुंडे, बीड जिल्ह्यात तुमचा जन्म झाला असेल तर...; बजरंग बप्पांचा थेट हल्लाबोल, दलाल म्हणत निशाणा
Santosh Deshmukh Beed Morcha : जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडूकं हाती घ्यावं लागेल; मनोज जरांगेंचा थेट इशारा, धनंजय मुंडेंवर निशाणा
जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडूकं हाती घ्यावं लागेल; मनोज जरांगेंचा थेट इशारा, धनंजय मुंडेंवर निशाणा
Manoj Jarange Patil : फक्त कमेंट केलेलं पोरगं आठ महिने आत आणि खून केलेला आरोपी सापडत नाही; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
फक्त कमेंट केलेलं पोरगं आठ महिने आत आणि खून केलेला आरोपी सापडत नाही; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
मी जातीनं वंजारी, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय; बीडमध्ये देशमुख कुटुंबासाठी जितेंद्र आव्हाड कडाडले
मी जातीनं वंजारी, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय; बीडमध्ये देशमुख कुटुंबासाठी जितेंद्र आव्हाड कडाडले
Embed widget