'नाद' खुळा... बीडमध्ये गॅस सिलेंडरचा गाडीचालक फुल टल्ली, 4-5 जणांना उडवण्याची धमकी; जमावाने बदडलं
चालकाला खाली उतरवल्याचा एवढा राग होता की त्याने 4-5 लोकांना उडवण्याची धमकी दिली. नंतर जमावाने गाडीचालकाला चांगलंच बदडलं आहे.

Beed: गॅस सिंलेंडरने भरलेला अवजड टेम्पो घेऊन जाणारा गाडीचालक भरधाव वेगात वाहन चालवत होता. त्याला थांबवल्यावर तो पूर्णपणे दारूच्या नशेत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. चालकाला लोकांनी खाली उतरवून जाब विचारला असता आता तुझ्यसकट चार पाच जणांना उडवतो अशी धमकी देत चालकाने मुजोरी केली. त्यामुळे आजूबाजूला जमलेल्या जमावाने चालकाला चांगलाच चोप दिलाय. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा सगळा प्रकार घडलाय. गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा चालकच अशा पद्धतीने दारूच्या नशेत आढळल्याने एखादा भीषण अपघात घडला असता तर त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Beed News)
नक्की झाले काय?
बीड शहरात गॅस सिलेंडरने भरलेला टेम्पो भरधाव वेगात घेऊन जाणारा टेम्पोचालक दारूच्या नशेत टल्ली असल्याचं स्थानिकांच्या लक्षात येताच टेम्पोचालकाला आजूबाजूच्या लोकांनी गाडीतून खाली उतरवले. दारू पिऊन अवजड वाहन चालवणाऱ्या टेम्पोमुळे लोकांचे जीव घेतो का विचारत लोकांनी वाहनचालकाला खाली उतरायला सांगितले. गाडीतून उतरण्यासही गाडीचालक आधी तयार नव्हता. शेवटी सगळ्या स्थानिकांनी त्याला खाली उतरवले. समोर कोण आहे न पाहता लोकांच्या अंगावर गाडी घालतो का? म्हणत लोकांनी जाब विचारायला सुरुवात केली असता दारूच्या नशेत 'टाईट' असलेल्या चालकानं मुजोरी करत चार पाच लोकं उडवली तर याच्यासकट सगळ्याला उडवतो अशी धमकी दिली. त्याने असं म्हणताच जमावाने गाडीचालकाला चांगलंच बदडलं आहे. यावेळी परिसरात मोठी गर्दी जमली होती. या घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. चालकाला खाली उतरवल्याचा एवढा राग होता की ज्याने खाली उतरवलं त्याच्यासह त्याने 4-5 लोकांना उडवण्याची धमकी दिली. नंतर जमावाने गाडीचालकाला चांगलंच चोपलं आहे.
वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर,बीडच्या पोलीस अधिकाऱ्याचा दावा
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचा एन्काऊंटर करण्याची ऑफर मला मिळाली होती, असा दावा बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले(Ranjeet Kasle) यांनी केला आहे. वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) बोगस एन्काऊंटरसाठी आपल्याला 5-10 कोटींपासून ते 50 कोटींची ऑफर दिली जाते, असेही कासले यांनी म्हटले. रणजीत कासले यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्यामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे.रणजीत कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते. काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आले होते.
हेही वाचा:























