'मातोश्री' बंगला बाळासाहेबांचे स्मारक म्हणून खुले करा, स्मृतिदिनी भाजपची मोठी मागणी
बाळासाहेब ज्या मातोश्री बंगल्यामध्ये अनेक वर्ष राहिले ,तो बंगला जिवंत स्मारक म्हणून जनतेसाठी खुला करावा अशी मागणी भाजपने केली आहे.
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा आज अकरावा स्मृतिदिन आहे. बाळासाहेंबाना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दाखल झालेत. अभिवादनासाठी सकाळपासूनच शिवाजी पार्कवर रांगा लागल्या आहेत. तसेच अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अभिवादन केलंय. भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिदनी पोस्ट करत मातोश्री बंगला जनतेसाठी खुले करण्याची मागणी केली आहे. बाळासाहेब ज्या मातोश्री बंगल्यामध्ये अनेक वर्ष राहिले ,तो बंगला जिवंत स्मारक म्हणून जनतेसाठी खुला करावा अशी मागणी राम कदम केली आहे. राम कदम यांनी पोस्ट करत ही मागणी केली आहे.
बाळासाहेब ठाकरे ज्या मातोश्री बंगल्यात राहिले.तेच खरे बाळासाहेबांचे खरे जिवंत स्मारक आहे. ते जनतेसाठी कधी खुले करणार? असा सवाल राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. राम कदम म्हणाले, उद्धव ठाकरे सध्या राहायला मातोश्री 2 वर गेले आहेत. जुन्या मातोश्री बंगल्यात बाळासाहेब अनेक वर्ष राहिले. अनेक धाडसी निर्णय ज्या बंगल्यात त्यांनी घेतले. दिवस रात्र त्यांचा ज्या स्थळी वावर होता. तेच खरे जिवंत स्मारक जनतेसाठी का खुले नाही?
मातोश्री जनतेसाठी कधी खुली करणार?
राम कदम पुढे म्हणाले, मातोश्री ही वास्तू खऱ्या अर्थाने देशभरातल्या जनतेसाठी प्रेरक आहे. त्यांनी वापरलेल्या वास्तूपासून त्यांचे ऑफिस, त्यांची राहण्याची खोली सर्वच काही अद्भूत प्रेरक आहे. ही वास्तू स्वर्गीय बाळासाहेबांचे खरे जिवंत स्मारक म्हणून जनतेसाठी कोणतीही सबब न देता उद्धवजी कधी खुली करणार? स्वतःला राहण्यासाठी मातोश्री 2 झालाच आहे. ही भावना प्रत्येक बाळासाहेबांना मानणाऱ्यांची आहे.
आज स्वर्गीय #बाळासाहेबांचा स्मृती दीन...
— Ram Kadam (@ramkadam) November 17, 2023
ज्या #मातोश्री बंगल्यात स्वर्गीय बाळासाहेब अनेक वर्ष राहिले..
तेच खरे जिवंत स्मारक जनतेसाठी का खुले नाही ?
अनेक धाडसी निर्णय ज्या बंगल्यात त्यांनी घेतले.. दिवस रात्र त्यांचा ज्या स्थळी वावर होता..
खऱ्या अर्थाने तीच वास्तू देशभरातल्या… pic.twitter.com/3ftphoD2Iy
बाळासाहेब ठाकरे यांचा आज अकरावा स्मृतिदिन
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Death Anniversary) यांचा आज अकरावा स्मृतीदिन आहे. या निमित्तानं मुंबईत शिवाजी पार्क (Shivaji Park) इथल्या स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. स्मृतीस्थळावर फुलांची आरास करण्यात आली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी दाखल झाले आहेत. महाविकास आघाडीचे नेतेही अभिवादनासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनाप्रमुख ठाकरे यांचे निधन 17 नोव्हेंबर 2012 रोजी झालं होतं. दरम्यान शिवसेनेकडून शिवाजी पार्कवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेना कार्यकर्ते त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवतीर्थावर दाखल होणार आहे.
हे ही वाचा :