एक्स्प्लोर

सरकारच्या निर्णयानंतर बच्चू कडूंचं सुतळी बॉम्ब फोडून सेलिब्रेशन

मुंबई : शेतकरी आंदोलनाला मोठं यश आलं आहे. कारण सुकाणू समिती आणि सरकारच्या उच्चाधिकार मंत्रिगटाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघाला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी तत्वतः मान्य करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर आमदार बच्चू कडू यांनी सुतळी बॉम्ब फोडून सेलिब्रेशन केलं. कर्जमाफी झाली नाही, तर मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब टाकू म्हणणाऱ्या बच्चू कडू यांनी अखेर सेलिब्रेशनसाठी सुतळी बॉम्ब फोडला. सुकाणू समितीचे सदस्य आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार मंत्रिगटाची सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. यावेळी शेतकरी संघटनांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. या बाबतीतले निकष ठरवण्यासाठी समिती नियुक्त केली जाईल. यामध्ये शेतकरी संघटनांचे प्रतिनिधीही असतील, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. शिवसेनेचे दिवाकर रावतेही सरकारच्या समितीमध्ये होते. या प्रश्नावर चर्चेच्या माध्यमातून सकारात्मक तोडगा काढल्यामुळे सरकारचे आभार मानले. तसंच शिवसेना कायम शेतकऱ्यांच्या पाठिशी असेल, असंही सांगितलं. अधिवेशनापूर्वी कर्जमाफी न झाल्यास पुन्हा आंदोलन : राजू शेट्टी सरकारने सकारात्मक चर्चा करुन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महत्वाचे निर्णय घेतल्याने 13 जूनला होणारा रोल रोको आणि आंदोलन मागे घेत असल्याचं सुकाणू समितीचे सदस्य आणि खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केलं. सरकारने 31 ऑक्टोबरपासून अल्पभूधारकांना कर्जमाफी देण्याचं मान्य केलं होतं. मात्र त्याबाबत आक्रमक भूमिका घेत आजपासूनच कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली. त्यामुळे आजपासून शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळेल, अशी हमी सरकारने दिल्याची माहिती सुकाणू समितीचे सदस्य आणि खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं. सरकारच्या तिजोरीत करदात्यांचा पैसा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा फायदा धनदांडग्यांना होऊ नये, यासाठी शेतकरी संघटनाही प्रयत्न करतील, असंही राजू शेट्टींनी सांगितलं. मात्र अधिवेशनापूर्वी म्हणजे 25 जुलैपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही, तर पुन्हा आंदोलन केलं जाईल, असंही राजू शेट्टी म्हणाले. स्वामिनाथन आयोगाच्या बाबातीत मुख्यमंत्री सर्वपक्षीयांसोबत पंतप्रधानांना भेटायला जातील. शेतकऱ्यांना कायम सरकारवर अवलंबून रहावं लागू नये, यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी गरजेच्या आहेत. त्यामुळे त्याबाबत आग्रही राहू, असंही राजू शेट्टींनी सांगितलं.  शेतकऱ्यांना कायम सरकारवर अवलंबून रहायला लागू नये यासाठी भूमिका मागणार रघुनाथ दादा पाटील सकाळपासून सरकारशी सकारात्मक चर्चा झाली. सरसकट कर्जमाफीचा मुख्य आग्रह होता. त्यानंतर कसलीही अटतट न ठेवता सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयाने छोट्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असं सुकाणू समितीचे सदस्य रघुनाथ दादा पाटील यांनी सांगितलं. शेतकरी आंदोलनामुळे नागरिकांना त्रास झाला. मात्र त्याचं फलित चांगलं मिळालं. त्यामुळे उद्याचं आंदोलन मागे घेत असल्याचंही रघुनाथ दादा पाटील यांनी सांगितलं. रक्तदान करुन सरकारच्या निर्णयाचं स्वागत : बच्चू कडू शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनीही सरकारचे आभार मानले. यापुढच्या आंदोलनात रक्त वाहणार होतं. मात्र आता रक्तदान करुन या निर्णयाचं स्वागत करु, असं बच्चू कडू म्हणाले. पुणतांबा गावाचे आभार दरम्यान ज्या पुणतांबा गावातून शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली, त्या पुणतांबा गावाचे सर्वांनी आभार मानले. शिवाय शेतकरी आंदोलनाचा यापुढचा लढा असाच सुरु राहिल, असा निर्धारही व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
Rohit Pawar: MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
Sushma Andhare On MPSC : MPSC पेपरफुटीची तक्रार करणारा 'तो' मुलगा नॉट रिचेबल, नेमका कशामुळे घाबरला? सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप
MPSC पेपरफुटीची तक्रार करणारा 'तो' मुलगा नॉट रिचेबल, नेमका कशामुळे घाबरला? सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप
24 वर्षांनी मायेच्या सावलीत, लेक परतला आईच्या कुशीत; SIR यादी पडताळणीतून उलगडा, अश्रूंचा बांध फुटला
24 वर्षांनी मायेच्या सावलीत, लेक परतला आईच्या कुशीत; SIR यादी पडताळणीतून उलगडा, अश्रूंचा बांध फुटला

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
Cockroach Janata Party: तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
Rohit Pawar: MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
Embed widget