एक्स्प्लोर

निवडणुकीत पैशांसह जाती धर्माचा वापर, सत्तेच्या आधारे निवडणूक आयोगाचा वापर करणं चुकीचं, बच्चू कडूंचा 'प्रहार'

सत्ता आहे म्हणून निवडणूक आयोगाचा (Election Commission) वापर करुन घेणं चुकीचं असल्याचे मत प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू (Bacchu kadu) यांनी व्यक्त केलं.

Bacchu kadu on Loksabha Election : सत्ता आहे म्हणून निवडणूक आयोगाचा (Election Commission) वापर करुन घेणं चुकीचं असल्याचे मत प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू (Bacchu kadu) यांनी व्यक्त केलं. धर्म, जात आणि पैसा या तीन गोष्टी अतिशय ताकतीने या निवडणुकीत वापर झाला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत एखाद्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीसारखे पैसे वाटप करुन मतदान घेण्याचा प्रकार झाला, हे लोकशाहीसाठी घातक ठरणार असल्याचे कडू यावेळी म्हणाले. 

लोकांचा विश्वास कायम राहण्यासाठी लोकशाहीमध्ये निवडणुका होतात

लोकशाहीमध्ये लोकांचा विश्वास कायम राहण्यासाठी निवडणुका असतात. त्या निवडणुकांमध्ये स्पष्ट आणि निस्वार्थ निष्पक्षपणे निवडणुका झाल्या पाहिजेत, असे मत प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी व्यक्त केलं. निवडणुका जर निस्वार्थी होताना दिसत नसतील तर लोक निवडणुका हातात घेतात.  कुठलाही सत्ताधारी असू दे मग ते भाजपवाले किंवा काँग्रेसवाले असेही बच्चू कडू म्हणाले. 

मतदान करण्यासंदर्भात लोकांची निराशा

मतदानाच्या टक्केवारीसंदर्भात देखील बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकांची याबद्दलची निराशाच असू शकते. मतदान घटण्याची वेगवेगळी कारणे आहेत. त्यातील एक कारण म्हणजे निराशा हे असू शकते असंही बच्चू कडू म्हणाले.  

भ्रष्टाचार एवढा वाढलं की, मरण्याची भीती कुणाला राहिली नाही

दरवर्षी या घटना घडतात, त्यात काही कोणी उद्योगपती मरताना पाहिला नाही. कोणी मरु नये पण जे काही आतापर्यंतच्या पन्नास साठ वर्षाचा हिशोब घेतला तर यात लहान मजूर कामगार मरतात. त्या अदाखलपात्र असतात. या घटना डिजिटल आणि आधुनिक काळात घडत असल्याचे बच्चू कडू म्हणाले. कल्याण दुर्घटनेबाबत कडू बोलत होते. फॅक्टरीच्या बाजूला घरे आहेत. त्याला परवानगी मिळाली कशी? असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला. भ्रष्टाचार एवढा वाढलं की, मरण्याची भीती कुणाला राहिली नाही. मरणारा गरीब आणि कामगार आहे. त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सरकारचा आणि अधिकाऱ्यांचा बदलला असल्याचे कडू म्हणाले. 

घोडा मैदान जवळ, 4 जूनला सगळं स्पष्ट होईल

लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात देखील बोलताना बच्चू कडू म्हणाले की, या निवडणुकांचा  एवढा अभ्यास केला नाही. घोडा मैदान जवळ आहे. 4 जूनला सगळं स्पष्ट होईल. तुमच्याकडं सर्वे असतात. अभ्यास असतो, ते तुम्ही दाखवा. आम्ही मत मागणारी लोक आहोत. मतं देणारे लोक आहोत. सर्व्हे करणारे तुमच्याकडे असतात. त्यामुळे तुम्हीच सांगा असे बच्चू कडू प्रसारमाध्यमांना म्हणाले. ते नागपुरात बोलत होते.

महत्वाच्या बातम्या:

जास्त पैसा झाला की रस्त्यावर मस्ती येते, पैशामुळं शौकीन लोक माणुसकी विसरले, पुणे हिट अँड रन प्रकरणावर बच्चू कडूंचा संताप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Embed widget