Bacchu Kadu : जातीचा संघर्ष थांबवा, छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांनी एकत्र येऊन लढावं! बच्चू कडूंचा सल्ला
Bacchu Kadu : भुजबळ आणि जरांगे यांनी एकत्र येऊन लढा द्यावा आणि हा जातीचा संघर्ष थांबवावा. यासाठी मी स्वतः भुजबळ आणी जरांगे यांची भेट घेणार असल्याचे मत आमदार बच्चू कडूंनी बोलताना व्यक्त केले आहे.
![Bacchu Kadu : जातीचा संघर्ष थांबवा, छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांनी एकत्र येऊन लढावं! बच्चू कडूंचा सल्ला Bacchu Kadu advice to Chhagan Bhujbal and Manoj Jarange over obc reservation and maratha reservation maharashtra marathi news Bacchu Kadu : जातीचा संघर्ष थांबवा, छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांनी एकत्र येऊन लढावं! बच्चू कडूंचा सल्ला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/19/ec5624f589eab13dd74622f63839cc501718796214982892_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Amravati News अमरावती : राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation) अत्यंत कळीचा होऊन गेला आहे. अशातच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिला असून वेळीच आमच्या मागण्या मान्य करण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी ओबीसींच्या आरक्षण बचावासाठी उपोषणाचे हत्यार उगारले आहे. दरम्यान लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आचा सातवा दिवस आहे. त्यामुळे राज्यांमध्ये सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असंच काहीसे चित्र निर्माण झालं आहे. अशातच यावर भाष्य करताना प्रहारचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडूंनीही (Bacchu Kadu) यांनी जातीचा संघर्ष थांबावून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे पाटील यांनी एकत्र येऊन लढण्याचा सल्ला दिला आहे.
स्वतः भुजबळ आणी जारांगे यांची भेट घेणार- बच्चू कडू
राज्यात सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद सुरु आहे. हे थांबलं पाहिजे. एकाकडे कोकणातल्या मराठ्यांनी या मागणीला विरोध दाखवला आहे. तर मराठवाड्यातल्या मराठा ओबीसी मध्ये यायला तयार आहेत. सध्याच्या आरक्षणात वाढ करून यावर तोडगा काढावा, असं माझं मतं आहे. तसेच ही लढाई भुजबळ आणी जारांगे यांनी एकत्र येऊन लढावी आणि हा जातीचा संघर्ष थांबवावा. यासाठी मी स्वतः भुजबळ आणी जारांगे यांची भेट घेणार असल्याचे मत ही बच्चू कडूंनी बोलताना व्यक्त केले आहे.
सरसंघचालकांनी आता बोलून उपयोग नाही- बच्चू कडू
देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुका आणि त्यांच्या निकालानंतर संघ नेतृत्वाची जाहीर भूमिका पहिल्यांदाच सर्वांसमोर आली. संघाच्या प्रशिक्षण प्रणालीत अत्यंत महत्वाच्या कार्यकर्ता विकास वर्गाच्या समारोपीय सोहळ्यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी सर्वच राजकीय पक्षांना कानपिचक्या दिल्या. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, आर एस एसने आकडेवारीवर बोलण्यापेक्षा परिणामावर बोलायला हवं होतं. जेव्हा अजित दादांना युतीत घेतलं तेव्हा बोलायला पाहिजे होतं. आता बोलणे योग्य नाही. एकीकडे नैतिकतेवर बोलायचं आणी दुसरीकडे आकडे सांगायचे हे योग्य नसल्याचेही बच्चू कडू म्हणाले.
शिवसेनेबाबत जे झालं ते वाईटच झालं
आज शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन आहे. पक्षात उभी फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेची शिवसेने कडून आज हा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यावर भाष्य करताना बच्चू कडूंनी खंत व्यक्त केली आहे. शिवसेनेबाबत जे झालं ते वाईटच झालं. पण आता त्याला काही इलाज नाही. असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)