Baba Siddique Murder : 'स्नॅपचॅट'मध्ये ठरला 'गन शॉट'चा प्लॅन, बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट नेमका कसा रचला? खळबळजनक माहिती समोर
Baba Siddique Murder Case : माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्याप्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आलं आहे.

मुंबई : माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddique Murder Case) यांच्या हत्येमुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. सिद्दिकी या हत्येचे धागेदोरे थेट लॉरेन्स बिश्नोई गँगपर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी हे थेट बिश्नोई गँगच्या संपर्कात होते, असा संशय व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत पोलिसांनी यामध्ये तिघांना ताब्यात घेतलं आहे. तर अन्य आरोपींचा शोध चालू आहे. दरम्यान, या प्रकरणात रोज नवनवी धक्कादायक माहिती समोर येत आहे. स्नॅपचॅट या मेसेजिंग अॅपमध्येच सिद्दिकी यांच्या हत्येचा कट शिजल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
गुरमेलने केली होती सलमानच्या घराची रेकी
मिळालेल्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपींनी अभिनेता सलमान खानच्या घराचीही रेकी केली होती. आरोपी गुरुमेल सिंह याने मागच्या महिन्यात सलमान खानच्या घराची रेकी केली होती, अशी माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबारानंतर कोणतीही माहिती समोर येऊ नये म्हणून आरोपी गुरमेल सिंह यांने गार्डनमध्ये त्याच्या मोबाईलचा डिसप्ले तोडला होता.
हत्येचा कट स्नॅपचॅटमध्ये शिजला?
सूत्रांच्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी यांच्या हत्येसंदर्भात आरोपींना सर्व माहिती स्नॅपचॅटच्या माध्यमातून दिली जायची. या अॅपमध्ये येणारे सर्व मेसेज वाचून आरोपी ते मेसेज लगेच डिलीट करायचे. या आरोपींना घरासाठी बनवण्यात आलेले आधारकार्डही स्नॅपचार्ट याच अॅपवर पाठवण्यात आले होते. स्नॅपचॅटवर पाठवण्यात आलेल्या आधारकार्डचा स्क्रीनशार्ट काढून ते लगेच डिलिट करण्याच्या सूचना आरोपींना देण्यात आली होती. तशी कबुली आरोपींनी दिली आहे.
घाटकोपरहून आणलं पिस्तुल
तसेच या हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तुल हे आरोपी शिवाने घाटकोपरहून आणले होते. ते आणण्यासाठी शिवा एकटाच गेला होता. या संपूर्ण प्रकरणात शिवकुमार, गुरमेल सिंग आणि मोहम्मद जिशान अख्तर हे मुख्य आरोपी आहेत. या तिघांनीच बाबा सिद्धीकी यांच्या हत्येचा कट पुण्यात रचला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
