(Source: ECI/ABP News/ABP Majha)
औरंगाबादच्या नामांतरावरुन मनसे आक्रमक; शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंच्या अंगावर पत्रकं भिरकावली
औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासाठी आज मनसेनं शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवली. औरंगाबाद शहरातील क्रांती चौकामध्ये मनसेकडून चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवण्यात आली. खैरे यांच्या अंगावर पत्रकं देखील भिरकावली.
औरंगाबाद : मसने कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या अंगावर पत्रकं भिरकावल्याची घटना घडली आहे. औंरगाबाद शहराच्या नामांतरावरुन मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच औरंगाबादचं संभाजीनगर कधी करणार? असा संतप्त सवालही मनसे कार्यकर्त्यांनी चंद्रकांत खैरे यांना केला आहे.
औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासाठी आज मनसेनं शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवली. औरंगाबाद शहरातील क्रांती चौकामध्ये मनसेकडून चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवण्यात आली. खैरे यांच्या अंगावर पत्रकं देखील भिरकावली. खरंतर उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावं, यासाठीचा वाद सुरु आहे. मनसेनं औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यासाठी 26 जानेवारीचं अल्टिमेटम दिलं होतं. त्यानंतर मनसेकडून आता चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवून आंदोलन करण्यात आलं. यावेळी खैरे यांनी मनसेची ही स्टंटबाजी असल्याचं म्हटलं तर मनसेनं देखील शिवसेनेला हे करून दाखवण्याचं आव्हान दिलं आहे.
पाहा व्हिडीओ : औरंगाबादच्या नामकरणावरुन मनसे आक्रमक; चंद्रकांत खैरेंच्या अंगावर मनसे कार्यकत्यांनी भिरकावली पत्रकं
याप्रकरणी बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, "माझ्या अंगावर पत्रकं भिरकावली. फक्त अशी दाखवली त्यांनी, हरकत नाही. मी ती घेतली आणि पुन्हा त्यांच्या अंगावर फेकली. मनसे हे फक्त नाटक करण्यासाठी उभे आहेत. मी स्वतः सांगतो की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला आहे. लवकरात लवकर तो आपल्याला दिसून येईल. पण मनसेला श्रेय मिळणार नाही, श्रेय फक्त शिवसेनेला मिळणार आहे. म्हणून मी सांगतो की, कोणत्याही परिस्थिती लवकरात लवकर नामांतर होणार आहे."
महत्त्वाच्या इतर बातम्या :