एक्स्प्लोर
तीन वर्षापासून तरुणाचा त्रास, वैतागलेल्या तरुणीचा गळफास
कन्नड तालुक्यातील वडनेर गावात ही धक्कादायक घटना घडली.

प्रातिनिधीक फोटो
औंरगाबाद: तरुणाच्या छळाला कंटाळून 18 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. कन्नड तालुक्यातील वडनेर गावात ही धक्कादायक घटना घडली. पीडित तरुणीने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. गेल्या तीन वर्षांपासून आरोपी तरुण छळ करत होता. कालही तरुणाने पाठलाग केला. त्यामुळे वैतागलेल्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे. त्रास देणाऱ्या आरोपीविरोधात कन्नड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
पुणे
क्रिकेट























