एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईत सिद्धीविनायकाच्या दागिन्यांचा आज होणार लिलाव
मुंबई : मुंबईचं आराध्य दैवत असलेल्या प्रभादेवीच्या श्रीसिद्धीविनायकाचरणी भक्तांनी अर्पण केलेल्या दागिन्यांचा आज लिलाव होणार आहे. आज रविवारी सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4 पर्यंत हा लिलाव चालेल. त्यामुळे श्रींचे दागिने खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्या भाविकांना आज हे दागिने खरेदी करता येतील.
सिद्धीविनायकाचरणी भाविकांनी अर्पण केलेल्या दागिन्यांची संख्या मोठी असते, त्यामुळे वेळोवेळी या दागिन्यांचा लिलाव केला जातो. आज होणारा लिलाव सकाळी 11 वाजता सुरु होईल. हा लिलाव दुपारी 4 वाजेपर्यंत होणार आहे. यापूर्वीचा लिलाव अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर एप्रिलमधे करण्यात आला होता..वर्षभर गणपती बाप्पाला नवसाचे आणि दान म्हणून आलेल्या दागिने लिलावाच्या माध्यमातून विक्रीसाठी ठेवले जातात.
या लिलावामध्ये बाप्पाच्या चरणी वाहिलेल्या विविध आकारातील सोन्याच्या अंगठ्या, प्रतिमा, लॉकेट, दुर्वा, सोन्याच्या साखळ्या, हार आदींचा समावेश असतो. भाविक बाप्पाचा प्रसाद म्हणून लिलावात मोठ्या उत्साहानं भाग घेतात आणि यावर्षीही हीच अपेक्षा सिद्धीविनायक न्यासाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement