एक्स्प्लोर

राज्यात खाकीवर पुन्हा हल्ला! उस्मानाबादमध्ये कत्तलखान्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर गावगुंडांचा हल्ला

 राज्यात खाकीवर पुन्हा हल्ला झाल्याचं समोर आलं आहे. डीजेला विरोध केल्यानं शेगाव पोलीस स्टेशनवर तर उस्मानाबादमध्ये अवैध कत्तलखान्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर गावगुंडांनी हल्ला केल्याची घटना घडली

उस्मानाबाद : तुमचं आमचं रक्षण करणारे पोलीसच असुरक्षित असल्याचं बुलढाणा आणि उस्मानाबादमधल्या घटनांनंतर म्हणण्याची वेळ आली आहे. डीजेला विरोध केला म्हणून थेट पोलीस ठाण्यावरच हल्ला करण्यात आल्याची घटना बुलढण्यात घडलीय तर उस्मानाबादमध्ये अवैध कत्तलखान्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर गावगुंडांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस समाधान नवले यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर बबन जाधव हे देखील गंभीर जखमी झालेत. 

कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्याचंही समजत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा अवैध कत्तलखाना नगरसेवक खलिफ कुरेशी यांचा असल्याचा आरोप होतोय. पोलिसांनी  नगरसेवर खलिफा कुरेशी, त्याचा भाऊ कलीम कुरेशी यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. माहितीनुसार इथल्या स्थानिक गुन्हे शाखेमध्ये काही तक्रारदारांनी येऊन खिरणीमळा भागामध्ये अवैध पद्धतीने कत्तलखाने सुरु असल्याची माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांची परवानगी घेऊन पथक 10.45 च्या वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी दाखल झालं. 

तिथे जाऊन छापा मारला तेव्हा एका पत्र्याच्या शेडमध्ये बारा ते चौदा लहान मोठी जनावरे कापलेली दिसून आली तसेच मांस अस्ताव्यस्त पडल्याचे पोलिसांना दिसले. तिथे असलेल्या चार लोकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते पळून गेले व लांब जाऊन पोलीसांच्या पथकावर हल्ला चढवला.
 
त्याचवेळी आणखी दोन लोक आले व त्यांनीही दगडफेक करण्यास सुरुवात केली. ज्यांनी तक्रार दिलेली होती, त्यांना मारहाण करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांनी जनावरे कापण्यासाठी वापरण्यात येणारे हत्याराने वार केल्याने त्यात काहीजण गंभीर जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 
 
शेगाव शहर पोलीस ठाण्यावर हल्ला

काल मध्यरात्रीच्या सुमारास शेगाव शहर पोलीस ठाण्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी पोलीस ठाण्याची तोडफोड केली आहे. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास एका ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने मोठ्या आवाजात डीजे पार्टी सुरू असल्याची तक्रार शेगाव शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी वाढदिवसाची पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वाढदिवसाच्या पार्टीत सुरू असलेला डीजे बंद झाला. यानंतर काही वेळेनंतर काही अज्ञातांनी थेट पोलीस ठाण्यावरच हल्ला केला. जवळपास 30 जणांचा जमाव पोलीस ठाण्यावर धावून आला. या जमावाने पोलीस ठाण्यातील फर्निचर, काचांची तोडफोड केली. पोलिसांनी या घटनेबाबत भाष्य करण्यास, माहिती देण्यास नकार दिला आहे. पोलिसांनी आठ ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. 

समाजकंटकांनी थेट पोलीस ठाण्यावर हल्ला करत तोडफोड केल्याने आता पोलिसांच्या कार्यक्षमेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सामान्य नागरिकांविरोधात कायद्याचा बडगा उगारणारे पोलीस आता हल्लेखोरांविरोधात किती कठोर कारवाई करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Embed widget