गायरान जमिनीवर निळा झेंडा लावला म्हणून दलित समाजावर गावाचा बहिष्कार; हिंगोलीमधील लाजिरवाणी घटना
लातूरच्या ताडमुगळी गावातील संपूर्ण मागासवर्गीय समाजावर बहिष्कार घालण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आज हिंगोली जिल्ह्यातील सावरखेडा गावातही अशीच एक घटना समोर आली आहे. या गावात दलित समाजावर बहिष्कार घालण्यात आला आहे.
![गायरान जमिनीवर निळा झेंडा लावला म्हणून दलित समाजावर गावाचा बहिष्कार; हिंगोलीमधील लाजिरवाणी घटना village boycott on backward class community in hingoli district savarkhed village गायरान जमिनीवर निळा झेंडा लावला म्हणून दलित समाजावर गावाचा बहिष्कार; हिंगोलीमधील लाजिरवाणी घटना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/06/99eb31a81fb816333579badefcea9e68_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Hingoli News Update : महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. परंतु, या पुरोगामी महाराष्ट्रात काही लाजिरवाणाऱ्या घटना घडत आहेत. लातूरच्या ताडमुगळी गावातील संपूर्ण मागासवर्गीय समाजावर बहिष्कार घालण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आज हिंगोली जिल्ह्यातील सावरखेडा गावातही अशीच एक घटना समोर आली आहे. या गावात दलित समाजावर बहिष्कार घालण्यात आला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सावरखेडा गावामध्ये गायरान जमिनीवर निळा झेंडा लावल्याच्या कारणावरून दलीत समाजावर संपूर्ण गावाने बहिष्कार टाकला आहे. गावातील महिला सरपंचाचे दीर भागवत मुंडे यांनी एक जानेवारी रोजी बैठक घेऊन संपूर्ण सवर्ण समाजाच्या वतीने दलितांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हापासून आजपर्यंत दलित समाजातील नागरिकांना पिठाच्या गिरणीवर दळून दिले जात नाही. शिवाय किराणा दुकानदार बाजार देत नाहीत.
धक्कादायक बाब म्हणजे दलित समाजातील नागरिकांना रिक्षातसुद्धा बसू दिलं जात नाही. आपत्कालीन परिस्थितीमध्ये एखाद्या महिलेला रूग्णालयात न्यायचे असेल तरीही दलित समाजातील महिला किंवा पुरुषांना ऑटोमध्ये बसू दिले जात नाही. याप्रकरणी आज दलित बांधवांच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देऊन दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, लातूरच्या ताडमुगळी गावातील संपूर्ण मागासवर्गीय समाजावर बहिष्कार घालण्यात आल्याचा प्रकाल कालच समोर आला होता. मागासवर्गीय असलेल्या या कुटुंबातील तरुणानं गावच्या देवळात नारळ फोडला म्हणून बहिष्कार घातला होता. तसंच हा बहिष्कार मोडणाऱ्यालाही दंड ठोठावण्याचं घोषित केलं होतं. तीन दिवसांपासून हा बहिष्कार होता. अखेरीस पोलिसांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी गावात जाऊन चर्चा केली. आणि पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा बहिष्कार मागे घेण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- देवळात नारळ फोडला म्हणून मागासवर्गीय समाजावर गावाचा बहिष्कार; लातूरमधील लाजिरवाणी घटना
- Lata Mangeshkar : जेव्हा 1983 च्या विश्वविजेत्या टीम इंडियाच्या सत्कारासाठी लतादीदी मदत करतात...
- Lata Mangeshkar : लतादीदी यांनी व्यक्त केली होती 'ही' खंत, म्हणाल्या...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)