एक्स्प्लोर

फडणवीसांचं फोडाफोडीचं राजकारण, अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप

काँग्रेसच्या काही नेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस सोडून गेलेले नेते फोन करुन भाजपमध्ये ओढण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला

मुंबई : विधानसभेत काँग्रेस स्वबळावर लढणार का? काँग्रेसला राष्ट्रवादीपेक्षा वंचित आघाडीवर भरवसा आहे का? विधानसभेत प्रकाश आंबेडकर काँग्रेसला 'हात' देणार का? मुंबईतल्या बैठकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे हे प्रश्न उपस्थित होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप अशोक चव्हाण यांनी केला. काँग्रेसच्या काही नेत्यांना मुख्यमंत्री आणि काँग्रेस सोडून गेलेले नेते फोन करुन भाजपमध्ये ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचं चव्हाण म्हणाले. काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील लवकरच भाजपमध्ये दाखल होत आहेत. तसंच काही काँग्रेस आमदारही भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी हा आरोप केल्याचं म्हटलं जातं. काँग्रेस नेतेच भाजपला फोन करत आहेत : गिरीश महाजन विधानसभेच्या तयारीसंदर्भात काँग्रेसची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस पदाधिकारी आणि नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल नाराजीचा सूर आळवला. ज्या ठिकाणी काँग्रेसचा पराभव झाला तिथल्या जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांनी राजीनामा दिल्याची माहितीही चव्हाण यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपची बी टीम असून लोकसभेत अनेक मतदारसंघात अपेक्षित मदत मिळाली नसल्याची तक्रार पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली. राष्ट्रवादीऐवजी वंचित आघाडीशी हातमिळवणी केल्यास काँग्रेसला जास्त फायदा होईल, असा सूरही काँग्रेस नेत्यांकडून ऐकायला मिळाला. महाराष्ट्रात काँग्रेसची पुरती वाताहात झाली आहे. राज्यात काँग्रेसला फक्त एकच खासदार निवडून आला. अशा परिस्थितीत काँग्रेसला भरवशाच्या आणि मतांची बिदागी मिळवून देणाऱ्या साथीदाराची साथ हवी आहे. काँग्रेसला वंचित आघाडीमध्ये त्या साथीदाराचा चेहरा दिसत आहे. लोकसभेत वंचित आघाडीने  41 लाख मतं खेचल्यामुळे आघाडीच्या नऊ उमेदवारांचा पराभव झाला होता. तसंच लोकसभेआधी आघाडी करण्यास प्रकाश आंबेडकरांनी नकार दिला होता. मात्र काँग्रेस हव्या तेवढ्या जागा सोडण्यास तयार झाल्यास प्रकाश आंबेडकर त्यांना टाळी देणार का याकडे देखील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. काँग्रेसने हातावरचं घड्याळ बाजुला काढून वंचितशी हातमिळवणी केली, तर राष्ट्रवादी काय भूमिका घेणार यावर देखील विधानसभेतल्या लढतीचं चित्र अवलंबून असणार आहे. राज ठाकरेंच्या मनसेसोबत विधानसभा लढण्याचा एक विकल्प शरद पवारांसमोर असणारच आहे भाजप आणि शिवसेनेच्या युतीवर जवळपास शिक्कामोर्बत झालंय, फक्त जागांची अधिकृत घोषणा व्हायची बाकी आहे. अशात काँग्रेस आणि वंचितने नवीन आघाडी जन्माला घातली आणि मनसेने राष्ट्रवादीशी घरोबा केला तर विधानसभेत तिहेरी लढत पाहायला मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या

शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादीच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget