एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वारी पंढरीची : तुकोबांची पालखी उंटवडी मुक्कामी, तर वाल्हे मुक्कामानंतर ज्ञानोबांच्या पालखीचं उद्या नीरा स्नान
तुकोबारायांच्या पालखीचा आजचा मुक्काम हा उंडवडीमध्ये असेल, तर ज्ञानोबा माऊलींची पालखी आज वाल्हे मुक्कामी असेल.
पुणे : आषाढी एकादशीसाठी वैष्णवांची मांदियाळी पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. वरवंड मुक्कामानंतर तुकोबांच्या पालखीने आज सोमवारी सकाळी प्रस्थान ठेवलं आहे. तुकोबारायांच्या पालखीचा आजचा मुक्काम हा उंडवडीमध्ये असेल. पाटसवरुन उंडवडीकडे जाणाऱ्या तुकारामाच्या पालखीसोबतच्या वारकऱ्यांना आज रोटी घाटातून जाण्याची जाण्याची पर्वणी असते. तर ज्ञानोबा माऊलींची पालखी आज वाल्हे मुक्कामी असेल.
एरव्ही तुकोबांच्या पालखीला फक्त दोनच बैलांच्या जोड्या असतात. आज मात्र या अवघड आणि नागमोडी वळणाच्या घाटातून जाण्यासाठी सहा बैलांच्या जोड्या या पालखीला लावण्यात आल्या होत्या. भगव्या पताका हाती घेतलेले वारकरी, तुळशी वृंदावन घेतलेल्या माऊली आणि फुलांनी सजवलेली तुकारामांची पालखी हे सगळं मोहक दृष्य डोळ्यांचं पारणं फेडणारं होतं.
दुसरीकडे जेजुरी मुक्कामी असलेल्या ज्ञानोबा माऊलींच्या पालखीने आज वाल्हेसाठी प्रस्थान ठेवलं आणि वाल्मिकी महाराजांच्या संजीवन समाधीच्या गावी आज ज्ञानेश्वर महारांजाची पालखी पोहचली. उद्या माऊलींच्या पालखीचे नीरा स्नान होणार आहे. या ठिकाणहूनच हा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
राजकारण
राजकारण
Advertisement