(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashadhi Wari : तुकाराम महाराजांच्या पालखीला धोतराच्या पायघड्या तर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सोहळ्याचा आज लोणंदमध्ये मुक्काम
माऊलींच्या पालखीता आज लोणंद येथे मुक्काम असणार आहे. त्यानंतर तरडगावला पालखी प्रस्थान करणार आहे. तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज बारामती तालुक्यातून दौंड तालुक्यात मार्गस्थ झाला आहे.
Ashadhi wari : संसार पंढरी आम्ही वारकरी , अगा पांडुरंगा सुखी ठेव सारी असे म्हणत सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना कर वारकरी पंढरीच्या दिशेनं जात आहेत. माऊलींच्या पालखीता आज लोणंद येथे मुक्काम असणार आहे. त्यानंतर तरडगावला पालखी प्रस्थान करणार आहे. तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज बारामती तालुक्यातून दौंड तालुक्यात मार्गस्थ झाला आहे. आज तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा दौंड तालुक्यातील सनसर या ठिकाणी विसावणार आहे
संत तुकारामांच्या पालखी आज दौंड तालुक्यातील सनसर येथे विसवणार
विठूनामाचा गजर करत देहू आळंदीहून प्रस्थान केलेल्या संत तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या दोन्ही पालख्या मजल दरमजल करत विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. तब्बल दोन वर्षांनंतर पालखी सोहळा निघाला आहे त्यामुळे वारकऱ्यांत प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. संत तुकारामांच्या पालखीचा आज दौंड तालुक्यातील सनसर मुक्काम असणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आज लोणंद येथे मुक्काम
विठूनामाच्या गजरात 21 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे देहू आळंदीहून प्रस्थान करण्यात आले. तब्बल दोन वर्षांनंतर पालखी सोहळा असल्याने वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय. महाराष्ट्रातील अनेक पालख्या पायी मजल दरमजल करत पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेतत. त्यानुसार पालखीचा आजचा दुसरा मुक्काम लोणंद मध्ये असणार आहे उद्या या पालखीचे तरडगाव कडे प्रस्थान होईल
संत गजानन महाराजांच्या पालखीचा आज उपळा येथे मुक्काम
शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी वाशिम जिल्ह्यात दाखल झाली आहे. अत्यंत शिस्तबद्ध पालखी म्हणून संत गजानन महाराजांच्या पालखीची ओळख आहे. 6 जूनला शेगाव येथून ही पालखी निघाली. भक्तिमय वातावरणात भक्तांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. पालखीचा आजचा मुक्काम उपळा या ठिकाणी असणार आहे. उद्या पालखी उस्मानाबाद येथून प्रस्थान करणार आहे.
कोरोनामुळे गेली दोन वर्ष वारकऱ्यांना पायी वारीत सहभागी होता आले नाही. त्यांच्या पायी वारीत खंड पडला. मात्र, परंपरेत खंड न पडू देता मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला. दोन वर्षांचा कठीण काळ लोटल्यानंतर यंदा मोठ्या थाटामाटात ही आषाढी वारी साजरी करण्यासाठी वारकरी उत्सुक झाले आहेत. गावागावांत वारकऱ्यांकडून तयारी सुरू झाली आहे. आता सर्व वारकऱ्यांना पालखी प्रस्थानाची आणि पायी विठोबाच्या चरणी माथा टेकविण्याची आस लागलेली आहे.