एक्स्प्लोर

Ashadhi Wari 2022 : 'माऊली, माऊली'च्या गजरात मुक्ताईची पालखी आज नामलगाव फाटा मुक्कामी; तर निवृत्तीनाथांच्या पालखीचा डोंगरगण येथे मुक्काम

Ashadhi Wari 2022 : आषाढी एकादशी निमित्ताने महाराष्ट्रातील ठिकठिकाणांहून पालखीचे प्रस्थान झाले आहे. संत गजानन महाराज, संत मुक्ताई यांची पालखी आज कोणत्या ठिकाणी मुक्काम असणार आहे हे जाणून घ्या.

Ashadhi Wari 2022 : कोरोना काळानंतर तब्बल दोन वर्षांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी पालखी सोहळा सुरु झाला आहे. यंदाची वारी निर्बंधमुक्त असल्यामुळे भाविकांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 6 जूनला गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने झालं. तर, 3 जूनला संत मुक्ताईचा आणि रूक्मिणी मातेचा पालखी सोहळा सुरु झाला. निवृत्तीनाथांच्या पालखीचा सोहळाही 13 जूनला झाला. हरिनामाचा गजर करीत पालखीचा हा मुक्काम आज नेमका कुठे असणार आहे? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

संत गजानन महाराजांच्या पालखीचा आज परळी (थर्मल) येथे मुक्काम 

शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी वाशिम जिल्ह्यात दाखल झाली आहे. अत्यंत शिस्तबद्ध पालखी म्हणून संत गजानन महाराजांच्या पालखीची ओळख आहे. 6 जूनला शेगाव येथून ही पालखी निघाली. भक्तिमय वातावरणात भक्तांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. पालखीचा आजचा मुक्काम परळी (थर्मल) या ठिकाणी असणार आहे. उद्या पालखी परळीहून प्रस्थान करेल तर रात्री पालखीचा मुक्काम परळी वैजनाथ येथे असणार आहे. 

माता रूक्मिणीच्या पालखीचा आज मु.पो. दैठना, जिल्हा परभणी येथे मुक्काम 

माता रूक्मिणीच्या पालखीची सुरुवात 3 जून रोजी सुरु झाली. हा पालखी सोहळा कौंडण्यपूर येथून प्रस्थान करण्यात आला. त्यानुसार आज रात्री मु.पो. दैठना, जिल्हा परभणी येथे मुक्काम असणार आहे. उद्या म्हणजेच शुक्रवारी 24 जून रोजी ही पालखी सकाळी मु.पो. दैठना, जिल्हा परभणी येथून प्रस्थान करेल. तर, रात्री संत जनाबाई मठ, गोदातट येथे पालखीचा मुक्काम असणार आहे. 

संत मुक्ताईच्या पालखीचा आज नामलगाव फाटा येथे मुक्काम

यंदाच्या आषाढी वारीसाठी संत मुक्ताईच्या पालखीचे 3 जूनपासून प्रस्थान झाले. जळगाव येथील कोथळी गावातील संत मुक्ताईचे जुने मंदिर म्हणजेच समाधी स्थळापासून हा पालखी सोहळा मोठ्या उत्साहाने संत मुक्ताईच्या जयघोषात पंढरपूरला रवाना होण्यास सज्ज झाला आहे. त्यानुसार आज पालखी नामलगाव फाटा मुक्कामी असणार आहे. उद्या म्हणजेच शुक्रवारी 24 जून रोजी ही पालखी बीड येथे प्रस्थान करेल, तर रात्रीचा मुक्काम बीड (मालवीस) या ठिकाणी असणार आहे. 

संत निवृत्तीनाथ पालखीचा आज डोंगरगण येथे मुक्काम 

संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा सोहळा 13 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करण्यासाठी निघाला. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेली पालखी आज डोंगरगण मुक्कामी असणार आहे. तर, उद्या म्हणजेच 24 जून रोजी पालखी सकाळी डोंगरगणहून प्रस्थान करेल. त्यानंतर रात्री अहमदनगर येथे पालखीचा रात्रभर मुक्काम असणार आहे. यंदाची वारी ही कोरोना निर्बंधमुक्त असल्याने मनसोक्त विठुरायाचे दर्शन पाहता येणार आहे. 

संत नामदेवांच्या पालखीचा आज परभणीत मुक्काम 

दोन वर्षांनंतर पालखीच्या सोहळ्याने अवघी पंढरी पुन्हा एकदा दुमदुमली आहे. भागवत धर्माची पताका सातासमुद्रापार पोहोचविणारे संत नामदेव महाराज (Sant Namdeo Maharaj) यांची पालखी 19 जून रोजी नरसी नामदेव येथून पंढरपूरकडे रवाना झाली. आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी ही पालखी पंढरपूरला शेकडो वारकऱ्यांसह पायी प्रवास करत असते. मानाच्या पालख्यांपैकी एक म्हणून नरसी नामदेव येथील नामदेव महाराजांच्या पालखीला विशेष महत्त्व आहे. पालखीचा आजचा मुक्काम परभणीत असणार आहे तर, उद्या म्हणजेच 24 जून रोजी पालखीचा मुक्काम पोखर्णीत असणार आहे.   

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उमेदवार पाडापाडीची ट्रीक, चौरंगी लढतीत डमी उमेदवारांची गर्दी, हातकणंगलेत 2 सत्यजित, 2 धैर्यशील रिंगणात
उमेदवार पाडापाडीची ट्रीक, चौरंगी लढतीत डमी उमेदवारांची गर्दी, हातकणंगलेत 2 सत्यजित, 2 धैर्यशील रिंगणात
Mahua Moitra Video Fact Check : महुआ मोईत्रांनी उर्जेचा स्त्रोत सेक्स खरंच म्हटलं होतं का? व्हायरल व्हिडिओतील सत्य समोर
Fact Check : महुआ मोईत्रांनी एनर्जीचे रहस्य सेक्स खरंच म्हटलं होतं का? व्हायरल व्हिडिओतील सत्य समोर
पुण्यात शिक्षण, दुबई अन् लंडनमध्ये घर, अलिशान कार; 1400 कोटींची संपत्ती असलेल्या भाजपा उमेदवार
पुण्यात शिक्षण, दुबई अन् लंडनमध्ये घर, अलिशान कार; 1400 कोटींची संपत्ती असलेल्या भाजपा उमेदवार
Raksha Khadse vs Rohini Khadse : 'कोणी कोणत्या पक्षात जावं'वरून रावेरमध्ये राजकारण तापलं, नणंद-भावजयने एकमेकींना सुनावले खडेबोल!
'कोणी कोणत्या पक्षात जावं'वरून रावेरमध्ये राजकारण तापलं, नणंद-भावजयने एकमेकींना सुनावले खडेबोल!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Nagpur : मतदानानंतर सर्व ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित, नागपूर, रामटेकचे ईव्हीएम कळमन्यातCM Eknath shinde on Uddhav Thackeray : खोटं बोल पण रेटून बोल ही ठाकरेंची नेहमीची सवयNavneet Rana vs Sanjay Raut : अमरावतीच्या सुनेला हलक्यात घेऊ नका, नवनीत राणांचा राऊतांना इशाराABP Majha Headlines : 4 PM  : 20 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उमेदवार पाडापाडीची ट्रीक, चौरंगी लढतीत डमी उमेदवारांची गर्दी, हातकणंगलेत 2 सत्यजित, 2 धैर्यशील रिंगणात
उमेदवार पाडापाडीची ट्रीक, चौरंगी लढतीत डमी उमेदवारांची गर्दी, हातकणंगलेत 2 सत्यजित, 2 धैर्यशील रिंगणात
Mahua Moitra Video Fact Check : महुआ मोईत्रांनी उर्जेचा स्त्रोत सेक्स खरंच म्हटलं होतं का? व्हायरल व्हिडिओतील सत्य समोर
Fact Check : महुआ मोईत्रांनी एनर्जीचे रहस्य सेक्स खरंच म्हटलं होतं का? व्हायरल व्हिडिओतील सत्य समोर
पुण्यात शिक्षण, दुबई अन् लंडनमध्ये घर, अलिशान कार; 1400 कोटींची संपत्ती असलेल्या भाजपा उमेदवार
पुण्यात शिक्षण, दुबई अन् लंडनमध्ये घर, अलिशान कार; 1400 कोटींची संपत्ती असलेल्या भाजपा उमेदवार
Raksha Khadse vs Rohini Khadse : 'कोणी कोणत्या पक्षात जावं'वरून रावेरमध्ये राजकारण तापलं, नणंद-भावजयने एकमेकींना सुनावले खडेबोल!
'कोणी कोणत्या पक्षात जावं'वरून रावेरमध्ये राजकारण तापलं, नणंद-भावजयने एकमेकींना सुनावले खडेबोल!
माढ्यात उत्तम जानकरांचा मोठा गौप्यस्फोट; फडणवीसांची भेट अन् 6 महिन्यांपूर्वीचं प्लॅनिंगच भरसभेत सांगितलं
माढ्यात उत्तम जानकरांचा मोठा गौप्यस्फोट; फडणवीसांची भेट अन् 6 महिन्यांपूर्वीचं प्लॅनिंगच भरसभेत सांगितलं
भिवंडीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, विद्यमान आमदाराचा राजीनामा
भिवंडीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, विद्यमान आमदाराचा राजीनामा
सत्ता वाईट! पूर्वी जेवायला बोलवायचे, आता चहा प्यायलाही कोणी बोलवत नाही, सदाभाऊंनी व्यक्त केली खदखद
सत्ता वाईट! पूर्वी जेवायला बोलवायचे, आता चहा प्यायलाही कोणी बोलवत नाही, सदाभाऊंनी व्यक्त केली खदखद
Raver Loksabha : संतोष चौधरींच्या नाराजीवर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य; रावेरमधील बंड थंड होणार?
संतोष चौधरींच्या नाराजीवर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य; रावेरमधील बंड थंड होणार?
Embed widget