Ashadhi Wari 2022 : संत गजानन महाराज पालखी आज भौरद मुक्कामी; तर मुक्ताईच्या पालखीचा आज टाकरखेड येथे मुक्काम
Ashadhi Wari 2022 : आषाढी एकादशी निमित्ताने महाराष्ट्रातील ठिकठिकाणांहून पालखीचे प्रस्थान झाले आहे. संत गजानन महाराज, संत मुक्ताई यांची पालखी आज कोणत्या ठिकाणी मुक्काम असणार आहे हे जाणून घ्या.
Ashadhi Wari 2022 : कोरोना काळानंतर तब्बल दोन वर्षांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी पालखी सोहळा सुरु झाला आहे. यंदाची वारी निर्बंधमुक्त असल्यामुळे भाविकांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 6 जूनला (काल) गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने झालं. तर, 3 जूनला संत मुक्ताईचा आणि रूक्मिणी मातेचा पालखी सोहळा सुरु झाला. पालखीचा हा मुक्काम आज नेमका कुठे असणार आहे? तसेच संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांचा पालखी सोहळा कधी असणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
गजानन संत महाराजांच्या पालखीचा आज भौरद, अकोला येथे मुक्काम
यंदाच्या आषाढी वारीसाठी 6 जूनपासून शेगावहून संत गजानन महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले. त्यानुसार आज दुपारी गायगांव येथे पालखीचे प्रस्थान असणार आहे. तर, भौरद या ठिकाणी रात्री पालखीचा मुक्काम असणार आहे. उद्या म्हणजेच बुधवारी 8 जून रोजी ही पालखी अकोला येथे प्रस्थान करेल, तर रात्री अकोला याच ठिकाणी रात्रभर पालखीचा मुक्काम असणार आहे.
माता रूक्मिणीच्या पालखीचा आज सातूरणा, अमरावती येथे मुक्काम
माता रूक्मिणीच्या पालखीची सुरुवात 3 जून रोजी सुरु झाली. हा पालखी सोहळा कौंडण्यपूर येथून प्रस्थान करण्यात आला. त्यानुसार आज सकाळी एकविरा देवी संस्थान येथून प्रस्थान झाले. तर, आज रात्री सातूरणा,अमरावती येथे पालखीचा मुक्काम असणार आहे. उद्या म्हणजेच बुधवारी 8 जून रोजी ही पालखी सकाळी सातूरणा येथून प्रस्थान करेल. तर, रात्री जुनी वस्ती, बडनेरा येथे रात्रभर पालखीचा मुक्काम असणार आहे.
संत मुक्ताईच्या पालखीचा आज टाकरखेड येथे मुक्काम
यंदाच्या आषाढी वारीसाठी संत मुक्ताईच्या पालखीचे 3 जूनपासून प्रस्थान झाले. जळगाव येथील कोथळी गावातील संत मुक्ताईचे जुने मंदिर म्हणजेच समाधी स्थळापासून हा पालखी सोहळा मोठ्या उत्साहाने संत मुक्ताईच्या जयघोषात पंढरपूरला रवाना होण्यास सज्ज झाला आहे. त्यानुसार आज दुपारी तालखेड येथे पालखीचे प्रस्थान असणार आहे. तर, टाकरखेड या ठिकाणी रात्री पालखीचा मुक्काम असणार आहे. उद्या म्हणजेच बुधवारी 8 जून रोजी ही पालखी तांदुळवाडी सिद्धेश्र्वर येथे प्रस्थान करेल, तर रात्री मोताळा या ठिकाणी रात्रभर पालखीचा मुक्काम असणार आहे.
आगामी पालखी सोहळे :
13 जून : संत निवृत्तीनाथ पालखी
20 जून : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा
21 जून : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
महत्वाच्या बातम्या :
- गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान; 700 भाविक 5 जिल्हे, 750 किमी अंतर पार करत आषाढीला पंढरपुरात पोहचणार
- Ashadhi Wari 2022 : संत मुक्ताईची पालखी आज भालेगांव मुक्कामी; तर माता रूक्मिणीच्या पालखीचा कुऱ्हा येथे मुक्काम
- Ashadhi Wari 2022 : गजानन महाराजांच्या पालखीचे उद्या प्रस्थान; असा असेल पालखीचा मार्ग