एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Ashadhi Wari 2022 : 'भेटी लागे जीवा', संत निवृत्तीनाथ पालखीचा अद्भुत सोहळा; पोलिसांचा बंदोबस्त

Ashadhi Wari 2022 Nivruttinath Maharaj Palkhi :संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज दिंडी सोहळ्यात महाराष्ट्रभरातून 46 दिंड्या सहभागी झाल्या असून यंदाची वारी निर्बंधमुक्त असल्यामुळे भाविकांमध्येही उत्साह आहे

Ashadhi Wari 2022 Nivruttinath Maharaj Palkhi : विठ्ठला, सगळीकडे सुख येऊ दे रे बा, अशी आळवणी करीत त्र्यंबकेश्वरातून हजारो  भाविक आज पालखी सोहळ्यात दाखल झाले असून थोड्याच वेळात संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याचे प्रस्थान पंढरपूरकडे मोठ्या उत्साहात होत आहे. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
 
तब्बल दोन वर्षांच्या व्यत्ययानंतर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पायी दिंडी आज (13 जून) आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या दिंडी सोहळ्यात महाराष्ट्रभरातून ठिकठिकाणाहून 46 दिंड्या सहभागी झाल्या असून यंदाची वारी निर्बंधमुक्त असल्यामुळे भाविकांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
 
हजारो भाविकांमध्ये उत्साह
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गेली दोन वर्ष पायी वारीवर शासनाने निर्बंध घातल्याने यंदा मात्र मोठा उत्साह वारकऱ्यांमध्ये आहे. जवळपास ४६ दिंड्या संत निवृत्तीनाथ पालखीत सहभागी होणार असून वारकऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. 
 
यंदाही एकेरी वाहतूक
संत निवृत्तीनाथ मंदिरचे प्रशासक राम लिपटे म्हणाले की यंदाही वारीसाठी एकेरी वाहतुकीचे नियोजन आहे. दरवर्षी वारीत अनेकदा अपघाताच्या घटना निदर्शनास येतात. त्या पार्श्वभूमीवर यंदा एकेरी वाहतुकीचे नियोजन आहे. जेणेकरून दिंडीतील वारकऱ्यांना कोणतीही इजा नको. वारी सुखकर होणे महत्त्वाचे, असे ते म्हणाले.
 
पोलीस कुमक तैनात
दरम्यान यंदा दिंडी सोहळ्यात हजारो भाविक दाखल झाल्याने पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये तीनशे हुन अधिक ग्रामीण पोलिसांची कुमक वाढविण्यात आली आहे. यामध्ये 200 होमगार्ड, 15 वरिष्ठ अधिकारी, 70 पोलीस कर्मचारी तैनात आहेत. 
 
इतर सुविधा
दरम्यान हजारो वारकरी आले असल्याने वैद्यकीय सुविधेसह पिण्याची पाण्याची व्यवस्था, वारकऱ्यांना मार्गदर्शनासाठी सेवेकरी नेमण्यात आले आहेत. तसेच संत निवृत्तीनाथ दिंडीतील सहभागी दिंड्याना दिंडी फलकही देण्यात आले आहेत.
 
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?Zero Hour : नाराज Eknath Shinde दरे गावात,महायुतीत नाराजीनाट्य?Devendra Fadnavis पुन्हा मुख्यमंत्री?Special Report Shilpa Shetty ED : शिल्पाचा घरी ईडी, राज काय? काय आहे पॉर्नोग्राफी प्रकरण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Embed widget