एक्स्प्लोर

Nagpur Pollution : नागपूरमधील हवेची गुणवत्ता बिघडली; सिव्हिल लाइन्सचा एक्यूआय 201वर; शहराच्या वातावरणात पसरला फटाक्यांचा धूर

एमपीसीबीची शंकरनगर, हिंगणा टी पॉइंट, महाल, मेडिकल चौक, एलआयटी आणि VNIT आदी ठिकाणी वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्रे असून एमपीसीबीतर्फे केवळ सिव्हिल लाइन्समधला डेटा अपलोड करण्यात आला आहे, हे विशेष.

Nagpur News : यंदा दिवाळीत कोणतेही निर्बंध नसले तरी शहरातील अनेक संस्था, संघटना व शासन स्तरावरही प्रदूषणमुक्त दिवाळी (eco friendly Diwali) साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, नागरिकांनी दिवाळीच्या पर्वावर शहरात मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले. सायंकाळपासून सुरु झालेले फटाके फोडण्याचे सत्र चक्क मध्यरात्रीपर्यंत सुरुच होते. त्यामुळे वातावरणात त्याचे परिणाम दिसून आले. फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे वातावरणात धुराची चादर पसरल्याचे चित्र निर्माण झाले होते.

मंगळवारी, शहरातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (Maharashtra Pollution Control Board) सिव्हिल लाईन्स केंद्रात वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) 201 नोंदवला गेला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार 50 ते 100 एक्यूआय हा समाधानकारक मानला जातो. त्यावर गेल्यास खराब स्थिती गणली जाते. प्रत्यक्षात सिव्हिल लाईन्समध्ये नागरी वसाहतीची घनता नाही. यामुळे फटाकेही कमी फुटतात, वाहनांची वर्दळ कमी आणि झाडे मात्र मोठ्या संख्येने आहेत. 

मेडिकल, महाल 300च्या वर?

सिव्हिल लाईन्स सारख्या भागात जर एक्यूआय 201 वर असेल तर महाल, मेडिकल चौक सारख्या भागात हवा गुणवत्ता निर्देशांक 300 च्या पुढे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा अर्थ हवेची गुणवत्ता अत्यंत खराब स्थितीत गेल्याचे म्हणावे लागेल. एमपीसीबीची शंकरनगर (Shankar Nagar), हिंगणा टी पॉइंट (Hingna T Point), महाल (Mahal), मेडिकल चौक (Medical Square), एलआयटी आणि व्हीएनआयटी (VNIT) आदी ठिकाणी वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्रे आहेत. मात्र, एमपीसीबीतर्फे केवळ सिव्हिल लाइन्समधला डेटा अपलोड करण्यात आला आहे. त्यामुळे नीरीसारख्या संस्थेला वायू गुणवत्तेचे अॅनॅलिसिस करणे कठीण होते.

शहरातील इतर भागांचे काय?

मात्र, सिव्हिल लाईन्समध्ये एसक्यूआय 201वर गेले तर इतर ठिकाणी स्थिती आणखी वाईट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. फटाक्यांमुळे शहराची हवा खराब झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वातावरणात पसरलेल्या धुरामुळे अनेकांना डोळे चुरचुरणे, श्वास घेण्यात बाधा यासारखा त्रास जाणवत आहे. आता मूळ स्थितीत येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. थंडीचे धुके आणि फटाक्यांच्या धुरामुळे संसर्गही वाढणार आहे. वातावरण बदलामुळे येत्या काही दिवसांत सर्दी, खोकला आणि घशाच्या संसर्गासारख्या समस्या वाढण्याची शक्यता आहे.

इतर महत्त्वाची बातमी

Arvind Kejriwal PC : चलनी नोटेवर महात्मा गांधी यांच्यासोबतच गणेश आणि लक्ष्मी यांच्या प्रतिमा मुद्रित करा : अरविंद केजरीवाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget