एक्स्प्लोर

Appasaheb Nalvade Gadhinglaj Sugar Factory Result : हसन मुश्रीफ की राजेश पाटील? दोन राष्ट्रवादीच्या आमदारांत कोण बाजी मारणार??

दोन राष्ट्रवादीच्याच आमदारांमध्ये कुस्ती लागल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या (गोडसाखर) निवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरु झाली आहे.

Appasaheb Nalvade Gadhinglaj Sugar Factory : दोन राष्ट्रवादीच्याच आमदारांमध्ये कुस्ती लागल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या (गोडसाखर) निवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरु झाली आहे. या कारखान्यासाठी रविवारी शांततेत 69.18 टक्के मतदान झाले होते. 25 हजार 91 पैकी 17 हजार 360, तर संस्था गटामध्ये 204 पैकी 237 सभासदांनी मतदान केलं आहे. गडहिंग्लज शहरातील गांधीनगरमधील पॅव्हेलियन हॉलमध्ये सकाळी आठपासून मतमोजणी सुरु झाली आहे. सायंकाळी 6 पर्यंत निकाल अपेक्षित आहे. 

पॅव्हेलियन हॉलमध्ये 33 टेबलांवर ही प्रक्रिया चालणार असून मतमोजणीसाठी 150 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. केंद्रनिहाय मतमोजणीचे नियोजन केल्यामुळे दोन फेऱ्या होतील. शिवाय सर्व गटांचे निकाल एकाचवेळी मिळतील. सायंकाळी सहापर्यंत मतदारांच्या हातात निकाल देण्याचा विश्वास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

केंद्रनिहाय मतमोजणीचे नियोजन केले आहे. ३३ टेबलवर ही प्रक्रिया चालेल. एका टेबलला एक पर्यवेक्षक व दोन सहायकांची नियुक्ती केली आहे. एका टेबलला एका केंद्राची मतपेटी दिली जाणार आहे. प्रत्येक 50 मतपत्रिकांचे गट्टे तयार करून मतांची मोजणी होणार आहे. त्यांची थेट मोजणी केली जाणार आहे. त्यामुळे एकाचवेळी सर्व उत्पादक गट व राखीव गटांची मोजणी होणार आहे. अशाच पद्धतीने दुसरी फेरी होईल.

या निवडणुकीत शाहू सभेचा शेतकरी आघाडी व काळभैरव शेतकरी कामगार विकास आघाडी थेट लढत होत आहे. 19 जागांसाठी 43 उमेदवार रिंगणात आहेत. पाच अपक्षही आहेत. तालुक्यातील 74 केंद्रांवर 700 हून अधिक कर्मचाऱ्‍यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. शाहू आघाडीचे आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण, संग्राम कुपेकर यांनी तर काळभैरव आघाडीचे नेते आमदार राजेश पाटील, श्रीपतराव शिंदे, संग्रामसिंह नलवडे, स्वाती कोरी, शिवाजी खोत यांनी विविध केंद्रांवर भेटी देऊन मतदानाची माहिती घेतली होती. 

दरम्यान, मंगळवारी मतमोजणी पालिकेच्या गांधीनगर पॅव्हेलियन हॉलमध्ये मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. एका टेबलवर दोन केंद्रांची मतमोजणी होईल. प्रत्येक 50 मतपत्रिकांचे गट्टे तयार करून मतांची मोजणी होणार आहे. प्रत्येक केंद्रातील मतदारसंख्येवर आधारित फेऱ्या निश्चित होतील. 

मुश्रीफ व पाटील यांच्यात ही प्रतिष्ठेची लढत 

या निवडणुकीमध्ये हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी गडहिंग्लजमधील कुपेकर गटासह भाजप, शिवसेना, स्वाभिमानी, काँग्रेस, अप्पी पाटील यांना सोबत घेऊन आघाडी केली आहे. आमदार राजेश पाटील यांनी जनता दल, निवृत्त कामगार संघटना, काँग्रेस युतीची आघाडी रिंगणात उतरविली आहे. त्यामुळे एकाच पक्षाचे आमदार असलेले मुश्रीफ व पाटील यांच्यात ही प्रतिष्ठेची लढत आहे. राष्ट्रवादीचे जिल्ह्यात दोनच आमदार आहेत. मात्र, त्यांच्यातही गटबाजीचे ग्रहण आहे. त्यामुळे गोडसाखर निवडणुकीमध्ये ‘राष्ट्रवादी’मधील या दोन्ही आमदारांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. हसन मुश्रीफ बाजी मारणार की गोकुळमधील जिव्हारी लागलेल्या पराभवाचे राजेश पाटील परतफेड करणार याकडे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget