"उद्धव ठाकरेंनी सांगितलंय, सगळे वाद बाजूला ठेवून एकत्र यायला तयार, आता राज ठाकरेंनी निर्णय घ्यावा'
मराठी लोकांच्या मनात दोन ठाकरे एकत्र यावेत यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. चर्चेची दार आम्ही कधीच बंद केली नसल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी केलं आहे.

मुंबई : मराठी लोकांच्या मनात दोन ठाकरे एकत्र यावेत यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. चर्चेची दार आम्ही कधीच बंद केली नसल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी केलं आहे. दोन्ही प्रमुख नेते भेटतील चर्चा करतील आणि ठरवतील. दोन्ही सेनेमध्ये पक्ष नेतृत्व जो निर्णय घेतील त्यानुसार पुढे जाऊ असेही अनिल परब म्हणाले. जशा निवडणुका जवळ येतील तसे दोन नेते निर्णय घेतील. मी छोटा नेता आहे. दोघे नेते बसतील आणि ठरवतील असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे की, सगळे वाद बाजूला ठेवून सोबत यायला तयार आहोत. राज ठाकरे यांनी ठरावयाचं आहे आमच्या सोबत एकत्र यायचं की नाही असे अनिल परब म्हणाले. महाराष्ट्र हितासाठी त्यांनी ठरावाव आम्ही चर्चे साठी सकारात्मक आहोत असेही परब म्हणाले.
पालकमंत्रीपद आणि वेगवेगळी गणित मांडण्यात सरकारचा वेळ जातोय
शेवटी भाजपने ज्याचा सतत विरोध केला होता तो विरोध झुगारुन छगन भुजबळ यांना मंत्रीपद दिल्याचे अनिल परब म्हणाले. भाजप आपल्याच भूमिकेला तिलांजली देत आहे. हे सरकार राक्षसी बहुमतात आहे, भाजप कार्यकर्ते दुःखी आहेत, त्यांनी मेहनत करून सत्तेत येऊन सुद्धा काही फायदा होत नाही. त्यामुळं कटशाह करण्याचा काम या सरकारमध्ये सुरु आहे. पालकमंत्रीपद आणि वेगवेगळी गणित मांडण्यात त्यांचा वेळ जातोय असेही अनिल परब म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयने जे जजमेंट दिलं आहे, त्यानुसार उर्वरित महाराष्ट्र ओबीसीचा निर्णय न्यायालयाने लावला आहे. जिल्हा परिषद, नगर पंचायत निवडणुका त्यांना 4 महिन्यात घ्याव्या लागतील. मुंबई महापालिका निवडणुकीत आरक्षणाचा विषय नाही. इथे फक्त जागा 227 कीं 236 हाच प्रश्न होता. यावर कुठलाही स्टे नाही. उद्याही निवडणूक ते घेऊ शकतात. त्यांचा प्रशासक बसला आहे हवं ते करु शकतात. प्रशासकाच्या माध्यमातून हवं तसे काम त्यांना करता येते, मुंबई महापालिका लुटता येते अशी टीका परब यांनी केली.
आशिष शेलार यांनी ज्योतिष्याचा धंदा कधीपासून सुरु केला? अनिल परब यांचा सवाल
अनिल परब यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांच्यावरी जोरदार टीका केली. शेलार यांनी ज्योतिष्याचा धंदा कधीपासून सुरु केला? असा सवाल परब यांनी केला. आमच्या 50 येतील किंवा किती नगरसेवक येतील हे जनता ठरवणार आहे. आता मुंबई सेवक तुम्ही होणार? सगळेच सेवक हे लोकप्रतिनिधी असतात. तुम्हाला मालक व्हायाचं होतं का? असा सवाल करत परब यांनी त्यांच्यावर टीका केली. आशिष शेलारांच्या मतदारसंघतले नगरसेवक निवडणून येणार का? असा टोला देखील परब यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या:
Sanjay Raut on Raj Thackeray and Uddhav Thackeray : पडद्यामागे पटकथा लिहिली जाणार...; राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर संजय राऊतांचं मोठं विधान
























