एक्स्प्लोर

अनिल अंबानी पुन्हा अडचणीत? चीनी बँकांकडून लंडनच्या कोर्टात खटला

रिलायन्स ग्रुपचे प्रमुख अनिल अंबानी यांच्या विरोधात 3 चीनी बँकांनी लंडनच्या कोर्टात खटला दाखल केला आहे. परिणामी अनिल अंबानी पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

मुंबई : रिलायन्स ग्रुपचे प्रमुख अनिल अंबानी पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. अनिल अंबानी यांच्या विरोधात 3 चीनी कंपन्यांनी लंडनच्या न्यायालयात खटला दाखल केला आहे. इंडस्ट्रियल अॅण्ड कमर्शियल बँक ऑफ चायना, चायना डेव्हलपमेंट बँक आणि एक्सपोर्ट-इंपोर्ट बँक ऑफ चायना या 3 बँकांनी 48.53 अब्ज रुपयांचा दावा अंबानी यांच्या विरोधात ठोकला आहे. या बँकांनी दावा केला आहे, की रिलायन्स कम्युनिकेशन्स म्हणजेच आरकॉमला 2012 मध्ये 92.52 कोटी डॉलरचे कर्ज दिले होते. हे कर्ज न फेडल्याने हा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, अनिल अंबानींचे वकील रॉबर्ट हॉवने न्यायालयात बाजू मांडताना म्हटलं आहे, की मुकेश अंबानी यांनी कधीच पर्सनल गँरंटी दिली नाही. दरम्यान, भारतीय विमा नियामक मंडळ इरडाने रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेडकडून नवीन पॉलिसी विकण्यावर बंदी आणण्यात आली आहे. ही कंपनीही आर्थिक संकटात असल्यानं जुन्याच ग्राहकांना सेवा देत राहणार आहे. याआधीही मुकेश अंबानी आले होते अडचणीत सुप्रीम कोर्टाने रिलायन्स कम्युनिकेशन्सचे अध्यक्ष अनिल अंबानींना टेलिकॉम उपकरणं बनवणारी कंपनी एरिक्सनच्या कर्जाची परतफेड करण्याचा आदेश दिला होता. परंतु अनिल अंबानींनी जाणीवपूर्वक परतफेड केली नाही, असं सांगत सुप्रीम कोर्टाने अंबानींना कोर्टाच्या अवमानप्रकरणी दोषी ठरवलं होतं. चार आठवड्यात एरिक्सनेचे पैसे परत करा अन्यथा तीन महिने जेलमध्ये जावं लागेल, असं सुप्रीम कोर्टाने आदेशात म्हटलं होतं. सुप्रीम कोर्टाने रिलायन्स कम्युनिकेशन्सला 550 कोटी रुपये परत करण्यासाठी 19 मार्चपर्यंतची मुदत दिली होती. यानंतर रिलायन्स कम्युनिकेशन्सने कोर्टाच्या आदेशानुसार, एरिक्सनला 550 कोटी रुपये परत केले. संबंधित बातम्या : 4 आठवड्यात 453 कोटी रुपये द्या, अन्यथा तीन महिन्यांची जेल; अनिल अंबानींना सुप्रीम कोर्टाचा दणका भावा वाचवलंस... मुकेश अंबानींमुळे अनिल अंबानींची जेलवारी टळली! अनिल अंबानींकडून काँग्रेस आणि नॅशनल हेरॉल्डविरोधातील पाच हजार कोटींचा मानहानीचा खटला मागे

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget