एक्स्प्लोर
भावा वाचवलंस... मुकेश अंबानींमुळे अनिल अंबानींची जेलवारी टळली!
एरिक्सन इंडियाच्या याचिकेवर अनिल अंबानींना अवमाननेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात अनिल अंबानी यांच्याशिवाय रिलायन्स ग्रुपच्या दोन संचालकांनाही दोषी ठरवलं आहे.

मुंबई : कर्जाच्या बोज्यात दबलेल्या रिलायन्स कम्युनिकेशन्सने एरिक्सनला 550 कोटी रुपये व्याजासह फेडले. यामुळे सुप्रीम कोर्टाच्या अवमाननेप्रकरणी दोषी आढळलेले अनिल अंबानींची जेलवारी थोडक्यात टळली. हे सगळं शक्य झालं ते त्यांचे मोठे भाऊ मुकेश अंबानी यांच्या मदतीने. अनिल अंबानी यांच्या कठीण काळात भाऊ मुकेश आणि वहिनी नीता अंबानी यांनी मदतीचा हात पुढे केला.
एरिक्सनचे व्याजासह 550 कोटी रुपये फेडल्यानंतर अनिल अंबानींनी भाऊ आणि वहिनीचे आभार मानले. अनिल अंबानी म्हणाले की, "कठीण काळात माझ्यासोबत उभं राहून मदत केल्याने मी त्यांचे मनापासून आभार मानलं. गरजेच्या वेळी मदत करुन त्यांनी कुटुंबाची मूल्य आणि कुटुंबाचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. मी आणि माझं कुटुंब अतिशय आभारी आहे की, आम्ही जुन्या गोष्टी मागे सोडून पुढे गेलो आहोत. त्यांच्या या कृतीने मला खोलपर्यंत प्रभावित केलं आहे."
4 आठवड्यात 453 कोटी रुपये द्या, अन्यथा तीन महिन्यांची जेल; अनिल अंबानींना सुप्रीम कोर्टाचा दणका
सुप्रीम कोर्टाने रिलायन्स कम्युनिकेशन्सचे अध्यक्ष अनिल अंबानींना टेलिकॉम उपकरणं बनवणारी कंपनी एरिक्सनच्या कर्जाची परतफेड करण्याचा आदेश दिला होता. परंतु अनिल अंबानींनी जाणीवपूर्वक परतफेड केली नाही, असं सांगत सुप्रीम कोर्टाने मागील महिन्यात अनिल अंबानींना कोर्टाच्या अवमानप्रकरणी दोषी ठरवलं होतं.
चार आठवड्यात एरिक्सनेचे पैसे परत करा अन्यथा तीन महिने जेलमध्ये जावं लागेल, असं सुप्रीम कोर्टाने आदेशात म्हटलं होतं. सुप्रीम कोर्टाने रिलायन्स कम्युनिकेशन्सला 550 कोटी रुपये परत करण्यासाठी 19 मार्चपर्यंतची मुदत दिली होती. यानंतर रिलायन्स कम्युनिकेशन्सने कोर्टाच्या आदेशानुसार, एरिक्सनला 550 कोटी रुपये परत केले.
राहुल गांधी अनिल अंबानीवर टीका करत आहेत, तर कपिल सिब्बल बचाव!
VIDEO | अनिल अंबानींची जेलवारी टळली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
भारत
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
