एक्स्प्लोर

Angarki Sankashti Chaturthi 2021 Live : गणपती बाप्पा मोरया! निर्बंध शिथिलतेनंतरची पहिलीच अंगारकी

Angarki Sankashti Chaturthi 2021 Live : कोरोना काळात कुलुपबंद असलेली मंदिरं आता उघडली आहेत आणि त्यानंतर प्रथमच आलेल्या अंगारकी संकष्टीनिमित्त गणेशभक्त बाप्पाचं दर्शन मंदिरात जाऊन घेऊ शकणार आहेत.

LIVE

Key Events
Angarki Sankashti Chaturthi 2021 Live : गणपती बाप्पा मोरया! निर्बंध शिथिलतेनंतरची पहिलीच अंगारकी

Background

Angarki Sankashti Chaturthi 2021 Live : गणेश भक्तांसाठी महत्त्वाची असणारी अंगारकी चतुर्थी आज मंगळवारी आहे. अंगारकी चतुर्थी म्हटलं की गणेशभक्तांमध्ये विशेष उत्साह दिसतो. अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते अशी भावना आहे. त्यामुळे भाविकही अगदी भक्तीभावाने गणेशाची पूजा करून, त्याच्यासाठी उपवास धरून हे व्रत करतात. आज 23 नोव्हेंबर रोजी रात्री 08:27 वाजता चंद्रोदय होईल.

गेले दोन वर्ष कोरोनामुळे लोकांना अंगारकी चतुर्थी दिवशी आपल्या लाडक्या गणरायाचं दर्शन घेता आलेलं नाही. पण यंदा कोरोना ओसरु लागला आहे. महाराष्ट्र सरकारने मंदिरं सुरु केली आहे. कोरोना काळात कुलुपबंद असलेली मंदिरं आता उघडली आहेत आणि त्यानंतर प्रथमच आलेल्या अंगारकी संकष्टीनिमित्त गणेशभक्त बाप्पाचं दर्शन मंदिरात जाऊन घेऊ शकणार आहेत. त्यामुळे शासनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळत आपल्याला गणपती मंदिरात जाता येईल. असं असलं तरी देखील यंदा मंदिरांमध्ये तुलनेनं कमी गर्दी पाहायला मिळू शकते.

विशेष म्हणजे निर्बंध शिथिल झाल्यानं आज  अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर सज्ज झालं आहे. अंगारकीनिमित्त भाविकांना मंदाराच्या सिद्धी आणि रिद्धी या दोन्ही प्रवेशद्वारातून दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान, ज्या भाविकांकडे ऑनलाईन पास नाही, त्यांना श्री सिद्धिविनायकाचं दर्शन मिळणार नाही आहे. सोबतच, कोरोनाच्या सर्व मार्गदर्शक नियमांचे पालन देखील करावे लागणार आहे. रात्री 1.30 वाजल्यापासून बाप्पाच्या दर्शनाला सुरुवात झाली आहे. याशिवाय पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई मंदिरासह राज्यातल्या ठिकठिकाणच्या गणेश मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे.

संकष्टी चतुर्थीची पूजा- विधी

- सकाळी उठल्यानंतर आधी आंघोळ करा आणि स्वच्छ धुतलेले कपडे घाला.
- सकाळी गणपतीची पूजा करा.
- गणपतीला तीळ, गूळ, लाडू, दुर्वा, चंदन अर्पण करा, वंदन करा.
- संध्याकाळी गणपतीचे पूजन करा.
- व्रत कथा सांगा किंवा ऐका.
- चंद्राला अर्ध्य अर्पण करा.
- या दिवशी गणपतीच्या मंत्रांचा जप करावा.
- पूर्ण दिवसभर उपवास ठेवावा. चंद्रोदयानंतर सोडावा.

13:36 PM (IST)  •  23 Nov 2021

टिटवाळा गणपती मंदिरात अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी

अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त कल्याण नजीक टिटवाळा येथे महागणपतीचे दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. गर्दी होऊ नये यासाठी गाभाऱ्यातून दर्शन घेण्यास बंदी कारण्यात आली होती. पहाटे चार वाजल्यापासून भाविक दर्शनाला सुरुवात झाली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस, होमगार्ड, सामाजिक संस्था यांची मंदिरं प्रशासनाने मदत घेतली. अंगारकी चतुर्थीनिमित्त आज गणपती बाप्पालाही फुलं आणि दुर्वांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. 

13:31 PM (IST)  •  23 Nov 2021

Angarki Sankashti Chaturthi 2021 : थेट गाभाऱ्यातून Siddhivinayak बाप्पाचं दर्शन : Mumbai

एबीपी माझाच्या वाचक-प्रेक्षकांना थेट गाभाऱ्यातून सिद्धिविनायकाचं दर्शन 

13:30 PM (IST)  •  23 Nov 2021

उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या हस्ते सुवर्णगणेशाची प्रतिष्ठापना

रायगड जिल्ह्यातल्या दिवेआगर इथल्या प्रसिद्ध गणपती मंदिरात आज 9 वर्षांनी पुन्हा सुवर्णगणेशाची स्थापना होणार आहे. 9 वर्षांपूर्वी म्हणजेच 24 मार्च 2012 रोजी दरोडेखोरांनी दोन सुरक्षारक्षकांची हत्या करून सुवर्णमूर्ती आणि सोनं पळवून नेलं होतं. दरोडेखोरांनी विकलेलं सोनं पोलिसांनी छडा लावेपर्यंत वितळवलं गेलं होतं. कायद्याच्या कचाट्यात अडकलेलं हे सोनं राज्य सरकारकडे सोपवण्याचा निर्णय न्यायालयानं दिला. त्यानंतर मंदिरात पुन्हा सुवर्ण गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा मार्ग मोकळा झाला. आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सुवर्णगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. 

13:29 PM (IST)  •  23 Nov 2021

Mumbai Siddhivinayak: अंगारकी चतुर्थी निमित्ताने 50 हजार भाविक सिद्धिविनायकाचे दर्शन घेणार

अंगारकीनिमित्त मुंबईतलं सिद्धिविनायक मंदिर रात्रभर खुलं होतं. याशिवाय पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई मंदिरासह राज्यभरातील सर्व गणेश मंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे.

13:28 PM (IST)  •  23 Nov 2021

Angarki Sankashti : अंगारकी चतुर्थीनिमित्त राजुरेश्वर गणपतीला गर्दी

Angarki Sankashti : आज अंगारकी चतुर्थीनिमित्त जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध राजुरेश्वर गणपतीला दर्शनासाठी मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. गणपतीच्या साडेतीन पिठांपैकी एक असलेला राजूरचा राजुरेश्वर गणपती महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मध्यरात्री पासून विदर्भ मराठवाड्यातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी या ठिकाणी येऊ लागलेत, यावेळी बस बंद असल्याने पंचक्रोशितील गणेश भक्त पायी पायी दर्शनासाठी येत आहेत. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Vs Yashomati Thakur | नवनीत राणांकडून यशोमती ठाकूर यांचा नणंदबाई असा उल्लेखTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07.30 PMABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7 PM 07 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07 Nov ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Embed widget