(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra : आनंदाचा शिधा रेशनिंग दुकानात शिधा पोहोचला पण अजूनही वाटप नाही
Anandacha Shidha : राज्यातल्या गरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी सरकारनं आणलेला आनंदाचा शिधा, राज्यातल्या काही गावांमध्ये अजूनही मिळत नसल्याने टीकेचा धनी बनला आहे.
Anandacha Shidha : दिवाळीमध्ये गरजूंसाठी शंभर रुपयांमध्ये राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा देणार अशी घोषणा सरकारने केलेली होती. मात्र दिवाळी जवळ आल्यानंतरही अद्यापपर्यंत या वस्तू पुरेशा उपलब्ध झाल्या नसल्याचं समोर आलं आहे. काही जिल्ह्यामध्ये हे किट पोहचल्या आहेत तर काही जिल्हे अद्याप प्रतिक्षेतच आहेत. 20 तारखेपर्यंत या वस्तू लोकांपर्यंत पोहोचतील अस आश्वासन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलं होतं.
राज्यातल्या गरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी सरकारनं आणलेला आनंदाचा शिधा, राज्यातल्या काही गावांमध्ये अजूनही मिळत नसल्याने टीकेचा धनी बनला आहे. काही ठिकाणी शिधा आला आहे. पण शिधा वाटपासाठी लागणारी सरकारचा फोटो असलेली पिशवी पोहोचलेली नाही... काही ठिकाणी तर दोन वस्तू पोहोचल्या आहेत. तर दोन वस्तू अजूनही पोहोचल्या नाही आहेत. खरं तर अवघ्या 100 रुपयांमध्ये शिधा देण्याचा कौतुकास्पद निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण केवळ नियोजनाच्या अभावामुळे काही ठिकाणी हा शिधा पोहोचूनही लाभार्थ्यांच्या हाती पडत नाहीये.
राज्य सरकारने देऊ केलेला 100 रुपयाचा आंनदाचा शिधा आतापर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यातील गावात मिळालेला आहे. कुठे मिळाला नाही, याबाबतचा थोडक्याते घेतलेला आढावा...
पुणे जिल्ह्यात वाटायच्या आनंदाच्या शिधाच्या साहित्यापैकी 55 टक्के शिधा आल्याचं आणि तो रेशनिंग दुकानात पोह्चल्याचं पुरवठा विभागाकडून सांगण्यात आलं आहे. पुणे जिल्ह्यात एकुण नऊ लाख पंधरा हजार सहाशे बासष्ट शिधा किटची गरज आहे. त्यापैकी
साखर- 52.34 टक्के प्राप्त झालीय
रवा - 65.53 टक्के प्राप्त झालाय
चणाडाळ -39.46 टक्के प्राप्त झालीय
तर पामतेल 53.35 टक्के प्राप्त झाल्याच पुरवठा विभागाकडून सांगण्यात आलय.
हे किट ज्या पिशव्यांमधुन दिले जाणार आहे त्या पिशव्याही त्याच प्रमाणात प्राप्त झाल्याच पुरवठा विभागाकडून सांगण्यात आलय.
बारामती तालुका 220 रेशनिंग दुकाने त्यापैकी 72 दुकानात किट पोहोचले
बारामती तालुक्यात एकूण 82 हजार 200 लाभार्थी कुटुंब
100 रुपयांच्या किटमध्ये 1 किलो रवा, 1 किलो साखर, 1 लिटर पाम तेल, 1 किलो चना डाळ आणि एक शासनाची पिशवी
एकूण 148 रेशनिंग दुकानांमध्ये 2 दिवसांत हे किट पोहोचेल असं सांगण्यात आलं आहे.. पुरेसे तेल नसल्याने हे किट पोहोचायला अडचणी होत आहेत. उद्या आणि परवा पर्यत हे किट पोहोचवले जाईल अस तहसीलदार कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
सांगली जिल्ह्यात एकूण 1361 रेशन दुकानदार पैकी 389 रेशन दुकानदारापर्यत शिधा पोचला आहे
उद्यापर्यंत 70 टक्के शिधा पोचवला जाईल असं पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितलेय
एकूण मंजूर शिधावस्तू-1650704
एकूण प्राप्त शिधावस्तू-1220622
एकूण अप्राप्त शिधावस्तु-430082
कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 31.71% शिधा पोहचला आहे...मात्र यापैकी चारही वस्तू केवळ एका तालुक्यात पोहचल्या आहेत...
एकूण मंजूर शिधावस्तू- 2201468
एकूण प्राप्त शिधावस्तू- 698111
एकूण अप्राप्त शिधावस्तू- 1503357
पाकिटांची माहिती
रवा पाकीट- 169258
साखर पाकीट- 295651
चणाडाळ पाकीट- 70198
पामतेल पाकीट- 163004.
नागपूर जिल्हा -
आनंदाचा शिधा या योजनेसाठी नागपूर शहरात 3 लाख 85 हजार कुटुंब पात्र आहेत. त्यांच्यासाठी 2 लाख 95 हजार साखरेचे पाकीट आले आहे.. 3 लाख 85 हजार तेलाचे पाकीट आली आहेत.
80 हजार रव्याचे पाकीट आले आहेत...50 हजार चणा डाळीचे पाकीट आले आहेत..तर नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 4 लाख 11 हजार कुटुंब पात्र आहेत.त्यांच्यासाठी साखर आणि तेल शंभर टक्के प्राप्त झाला आहे...तर डाळ आणि रवा 50 टक्केच प्राप्त झाले आहे .. शहर आणि ग्रामीण मिळून 8 हजार पेक्षा जास्त लाभार्थ्यांना वाटप ही झाला आहे ..चणाडाळ आणि रवा उद्या मोठ्या प्रमाणावर प्रशासनाला मिळण्याची शक्यता आहे... चार ही वस्तू एकत्रित करून देण्यासाठी पिशव्या आवश्यक प्रमाणात मिळालेल्या आहे... ( म्हणजेच फक्त चना डाळ आणि रवा पुरेशा प्रमाणात नाही)
नाशिक जिल्ह्यात आनंदाच्या शिधा साहित्याचे एकूण 8 लाख लाभार्थी असून त्यासाठी 32 लाख शिधा पाकीटांची गरज आहे.
पामतेल - 40 टक्के प्राप्त झालय
साखर- 20 टक्के प्राप्त झालीय
चनाडाळ - 9 टक्के प्राप्त झालीय तर रवा फक्त 2 टक्के प्राप्त झाल्याचं पुरवठा विभागाकडून सांगण्यात येतय. हे किट ज्या पिशव्यांमधुन दिले जाणार आहे त्या पिशव्याचे प्रमाण कमी असले तरी योग्य ति व्यवस्था केली जाईल असे प्रशासनाच म्हणणं आहे. आजपासून हे किट वाटपाला सुरुवात होणार असून जिल्ह्यातील एकूण 15 पैकी उद्या त्र्यंबक, सिन्नर आणि चांदवड या तालुक्यात वाटप केले जाणार आहे. एकंदरीतच दिवाळी तोंडावर आली असतांना जिल्ह्यातील सर्व 8 लाख लाभार्थ्यांपर्यंत किट पोहोचेल की नाही ? हा प्रश्नच आहे..
नांदेड - जिल्ह्यात अद्याप आनंद शिधा आला पण नाही व वाटप पण झाला नाहीये.
हिंगोली - किट मधील सर्व साहित्य हिंगोली जिल्हा प्रशासनाकडे आले आहे परंतु अव्हारींग पिशवी आता पर्यंत आल्या नाहीत त्यामुळे वाटप ठप्प आहे.हिंगोली जिल्ह्यात 221000 इतक्या किट ची मागणी केली होती तेवढे साहित्य उपलब्ध झाले आहे
धुळे - जिल्ह्यासाठी 2 लाख 99 हजार लाभार्थी आहेत,मागणीच्या तुलनेत फक्त 20 टक्के माल गोडाऊनला पोहचला असून रेशन दुकांना पर्यंत पोहचलेला नाही, 21 तारखेपर्यंत रेशन दुकानात आनंद शिधा पोहचेल आणि 22 पासून वाटप सुरू होईल अशी माहिती पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे....
बुलढाणा - जिल्ह्यात अध्याप शिधाही नाही आणि पिशवीही नाही.
वाशिम - वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्या करिता फक्त चना डाळ, वाशिम तालुक्यात साखर तर कारंजा तालुक्यात पाम तेल उपलब्ध आहे येत्या दोन दिवसात सरकार कडून राशन कार्ड वर 100 रुपयात मिळणाऱ्या वस्तूं प्राप्त लाभार्थ्यांना वाटप होणार
औरंगाबाद – अद्याप मिळाले नाहीत
पालघर - जिल्ह्यात चार लाखाच्या वर लाभार्थी असून अजूनही शंभर रुपयांचा आनंदाचा शिधा पूर्णपणे प्राप्त झाला नसल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी पोपट ओमासे यांनी दिली आहे ज्या चार वस्तू लाभार्थ्याला मिळणार आहेत त्या पूर्ण वस्तू प्राप्त झाल्याशिवाय आम्हाला वाटप करता येणार नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे..
भंडारा - भंडारा जिल्ह्यात अपूर्ण शिधा प्राप्त झाला आहे. वाटप सुरू व्हायचा आहे.