एक्स्प्लोर
मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस लवकरच रॅम्पवर!
मुंबईः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस लवकरच न्यूयॉर्कमधील फॅशन शोच्या रॅम्पवर दिसणार आहेत. पुण्यातील एका फॅशन इन्स्टिट्यूटच्या वतीने मिसेस फडणवीस शो-स्टॉपर म्हणून न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये सहभागी होणार आहेत, असं वृत्त 'दी इंडियन एक्स्प्रेस' या वृत्तपत्राने दिलं आहे.
अमृता फडणवीस यांच्याकडून न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये युवा डिझायनर्सकडून तयार करण्यात आलेल्या कपड्यांचं प्रमोशन करण्यात येणार आहे. शिवाय मुलींच्या शिक्षणासाठीही जागृती केली जाणार आहे.
अमृता फडणवीस यांच्यासोबत न्यूयॉर्क फॅशन शोमध्ये सहभागी होणारे सर्व डिझायनर्स गरिब पार्शभूमीचे आहेत. खास त्यांचं प्रमोशन करण्यासाठी अमृता फडणवीस या फॅशन शोमध्ये सहभागी होणार आहेत. मुलींच्या शिक्षणाविषयी जागृती करणं हा आपला मुख्य उद्देश असल्याचं अमृता फडणवीस यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement