Amruta Fadnavis Bribe Case: कुख्यात बुकी अनिल जयसिंघानीचा जवळचा सहकारी निर्मल जयसिंघानीही अटकेत, गुजरातमध्ये बेड्या
Amruta Fadnavis Bribe Case: अनिल जयसिंघानीचा जवळचा सहकारी निर्मल जयसिंघानीला देखील अटक करण्यात आली आहे. अनिल जयसिंघानीला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.
Amruta Fadnavis Bribe Case: अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) फसवणूक प्रकरणी मोठी अपेडेट समोर येत आहे. बुकी अनिल जयसिंघानीचा (Anil Jaisinghani) जवळचा सहकारी निर्णल जयसिंघानी याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. निर्मल जयसिंघानीलाही (Nirmal Jaisinghani) मुंबई पोलिसांनी गुजरातमधून (Gujarat) ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. याच प्रकरणी कालच (सोमवारी) अनिल जयसिंघानीला गुजरातमध्ये अटक करण्यात आली आहे. अनिल आणि निर्मल जयसिंघानी या दोघांनाही मुंबईत आणलं असून आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. निर्मल जयसिंघानी बुकी अनिल जयसिंघानीला रसद पुरवण्याचं काम करत होता, अशी माहिती मिळतेय.
बुकी अनिल जयसिंघानीचा जवळचा सहकारी निर्मल जयसिंघानी याला मुंबई पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे. काल (सोमवारी) बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून ताब्यात घेण्यात आलं. त्यावेळी निर्मल जयसिंघानीही अनिलसोबत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. निर्मलने अनिलला लपण्यासाठी मदत केली आणि त्याला रसद पुरवण्याचं काम करत असल्याची माहिती समोर येत आहे. निर्मल स्वतःच्या नावावर हॉटेल रूम बुक करायचा आणि बुकी अनिल तिथे राहायचा, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली. तसेच, फरार होण्यासाठीही निर्मलनंच अनिलला मदत केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, निर्मलने अनिल जयसिंघानीला कशी मदत केली? आणि एकूण भूमिका काय होती? याचा शोध पोलीस घेत आहेत.
कशी झाली अनिल आणि निर्मल जयसिंघानीयाला अटक?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुख्यात बुकी अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून मुंबई गुन्हे शाखेनं अटक केली. त्यानंतरच अनिलचा साथीदार निर्मल जयसिंघानी यालाही गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. ज्यावेळी मुंबई पोलिसांनी अनिल जयसिंघानीला अटक केली. त्याचवेळी त्या गाडीतच एक ड्रायव्हर आणि निर्मल जयसिंघानीया उपस्थित होते. अनिल जयसिंघानीला पोलिसांनी अटक केली आणि त्याच्यासोबत असलेला ड्रायव्हर आणि निर्मलला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर दोघांनीही कसून चौकशी करण्यात आली. अखेर रात्री उशीरा निर्मल जयसिंघानीलाही पोलिसांनी अटक केली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी केलेल्या चौकशीत ज्या गाडीतून अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आली होती, ती गाडी निर्मल जयसिंघानीचीच असल्याचं समोर आलं आहे.
प्रकरण नेमकं काय?
एका केसमध्ये मदत करण्यासाठी डिझायनर अनिक्षा जयसिंघानी या तरुणीने अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. शिवाय त्यांना धमकी देखील देण्यात आली अशी तक्रार अमृता फडणवीस यांनी मुंबईतील (Mumbai) मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये (Malabar Hill Police Station) 20 फेब्रुवारी रोजी तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर अनिक्षाविरोधात गुन्हा दाखल झाला. अनिक्षा ही गेल्या 16 महिन्यांहून अधिक काळ अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती आणि तिने अमृता यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी करत 1 कोटी रुपयांच्या लाचेची ऑफर अमृता फडणवीस यांना अनिक्षा आणि तिच्या वडिलांनी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :