एक्स्प्लोर

Amravati : कोरोना, मेंदूज्वर झालेल्या विद्यार्थिनीचा पुनर्जन्म; 15 दिवसांनी कोमातून बाहेर काढण्यास डॉक्टरांना यश

अमरावती येथील दहावीची नेहा ही विद्यार्थिनी काही दिवसांपूर्वी घरी अचानक भोवळ येऊन कोसळली. तिची गंभीर प्रकृती लक्षात घेऊन सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या स्टाफने तिला दाखल करुन घेत तत्काळ उपचार सुरु केले. 

अमरावती : कोविड पॉझिटिव्ह म्हणून रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाल्यावर मेंदूज्वर आणि इतर आजारांचे लक्षणे आढळून आलेल्या एका विद्यार्थिनीवर आरोग्य विभागाच्या कार्यतत्पर उपचारामुळे तिला पुनर्जन्म मिळाला आहे. उपचारादरम्यान ही विद्यार्थिनी पंधरा दिवस कोमात होती. डॉक्टरांच्या देखरेखीत ऑक्सिजन पुरवठा, प्रयोगशाळेत विविध तपासण्या आणि त्यानुसार तत्पर औषधोपचारामुळे आज ती पूर्णत: बरी होऊन स्वत:च्या घरी परतली. आपल्या लेकीला पुनर्जन्म मिळाल्याने वैद्यकीय सेवा देवदूत ठरल्याची प्रतिक्रिया तिच्या कुटुंबिय आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे..

आजही सरकारी रुग्णालयाबद्दल अनेक जण बोटं मोडतात. मात्र, याच सरकारी रुग्णालयात खाजगी रुग्णालयासारखेच उपचार होत असतात. अनेक प्रत्येक घटकातील रुग्णांचे प्राण याच सरकारी रुग्णालयात काम करणारे डॉक्टर आणि त्यांच्या चमूने वाचविले आहे हे विसरता कामा नये. असाच एक किस्सा अमरावती जिल्हा रुग्णालयात पाहायला मिळाला. झालं असं की, अमरावती येथील रहिवासी इयत्ता दहावीची नेहा ही विद्यार्थिनी काही दिवसांपूर्वी घरी अचानक भोवळ येऊन कोसळली. कुटुंबियांनी तिला तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारार्थ डॉक्टरांकडे आणले पण प्रतिसाद न मिळाल्याने तिला अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयातील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. तिची गंभीर प्रकृती लक्षात घेऊन सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या स्टाफने तिला दाखल करुन घेत तत्काळ उपचार सुरु केले. 

Amravati : कोरोना, मेंदूज्वर झालेल्या विद्यार्थिनीचा पुनर्जन्म; 15 दिवसांनी कोमातून बाहेर काढण्यास डॉक्टरांना यश

नेहाला कोविड-19 ची बाधा झाल्याचे आढळल्याने प्रथमत: तिच्यावर त्यानुसार उपचार करण्यात आले. दरम्यान, तिचा ताप वाढू लागला होता. शरीराचे तापमान 104 पर्यंत पोहोचले होते. हे लक्षात घेऊन मेंदूचा सिटी स्कॅन, तसेच मेंदू आणि पाठीतील पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. तपासणी अंती मेंदूज्वर या आजाराचे निदान झाले आणि त्यानुसार उपचार करण्यात आले. नेहा सलग पंधरा दिवस कोमात होती. अशा स्थितीतही डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन तिला कोमातून बाहेर काढले. आज तिची प्रकृती सुधारली असून, तिला आज तिला अमरावतीच्या सरकारी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधून घरी परतण्याची परवानगी मिळाली. सुपर स्पेशालिटीच्या स्टाफने तिच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत तिला आरोग्यदायी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

कोविडबाधित आणि मेंदूज्वरासह इतर आजारांची लक्षणे असलेल्या कोमात गेलेली बालिका पूर्णत: बरी झाली आहे. डॉक्टर, पारिचारिका आणि इतर स्टाफच्या एकत्रित प्रयत्नांतून तिला पुनर्जन्म मिळाला आहे. तिची प्रकृती गंभीर होती. अशा रुग्णांच्या केसेस गुंतागुंतीच्या असतात. तथापि, सर्वांच्या प्रयत्नांनी तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली. तिला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य मिळो, अशी भावना आरोग्य विभागाने यावेळी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget