Covishield : कोविशिल्डच्या दुसऱ्या डोसनंतरही 16 टक्के लोकांत Delta Varient विरोधात अॅन्टिबॉडी नाही; ICMR चा खुलासा
कोविशिल्ड (Covishield) लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या 16.1 टक्के लोकांमध्ये अॅन्टिबॉडी तयार झालेल्या नाहीत असं ICMR च्या एका अभ्यासातून स्पष्ट झालं आहे.
नवी दिल्ली : कोविशिल्ड लसीचा एक डोस घेतल्यानंतर 58.1 टक्के लोकांमध्ये डेल्टा व्हेरिएंटविरोधात अॅन्टिबॉडी तयार होऊ शकल्या नाहीत तर या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या 16.1 टक्के लोकांच्या शरीरात अॅन्टिबॉडी तयार झाल्या नसल्याचं इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल सायन्स अर्थात ICMR च्या एका अभ्यासातून स्पष्ट झालंय.
वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या मायक्रोबायोलॉजी विभागाचे माजी प्रमुख असलेले डॉ. टी जेकब यांनी सांगितलं की, अॅन्टिबॉडी न दिसणे आणि तयार न होणे या गोष्टी एकच नाहीत. यामध्ये न्यूट्रलायजिंग अॅन्टिबॉडीचा स्तर हा कमी असण्याची शक्यता असते. त्यामुळे ही गोष्ट लक्षात येत नाही. पण अशा अॅन्टिबॉडी शरीरात असू शकतात आणि त्यामुळे गंभीर लक्षणांपासून संरक्षण होऊ शकतं.
न्यूट्रलायजिंग अॅन्टिबॉडीच्या ट्रायट्रेस या विशेष रुपातील Sars-CoV-2 वायरसच्या विरोधात मारा करतात आणि त्याला मानवी शरीरातील कोशिकांमध्ये प्रवेश करण्यास अडथळा आणतात. न्यूट्रलायजिंग अॅन्टिबॉडीच्या ट्रायट्रेस या B1 व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंटमध्ये कमी आहेत. B1 व्हेरिएंटमुळे भारतात कोरोनाची पहिली लाट आली होती. B1 व्हेरिएंटच्या तुलनेत न्यूट्रलायजिंग अॅन्टिबॉडी ट्रायट्रेस या लसीचा पहिला डोस घेणाऱ्यामध्ये 78 टक्के कमी तर दुसरा डोस घेणाऱ्यांमध्ये 69 टक्के कमी होत्या. या व्यतिरिक्त संक्रमित झालेल्या आणि लसीचा डोस न घेतलेल्या लोकांमध्ये न्यूट्रलायजिंग अॅन्टिबॉडी ट्रायट्रेस 66 टक्के कमी सापडल्या. तसेच ज्या लोकांना कोरोनाची लागण झालेली होती आणि त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांच्या शरीरात न्यूट्रलायजिंग अॅन्टिबॉडी ट्रायट्रेस या 38 टक्क्यांनी कमी होत्या.
ICMR च्या या अभ्यासातून असं स्पष्ट होतंय की भारतातील लसीकरण अभियानात काही लोकांना कोविशिल्डच्या अतिरिक्त बूस्टर डोसची आवश्यकता पडू शकते. ज्या लोकांना या आधी कोरोनाची लागण झाली आहे त्यांना केवळ एकच डोस घेतला तरी पुरेसा आहे.
महत्वाच्या बातम्या :