(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bacchu Kadu : आमची पार्टी जरी दोन आमदारांची, तरी मी एकटाच शंभर आमदारांना पुरेसा; बच्चू कडूंची तुफान फटकेबाजी
Amravati News : आमची पार्टी फक्त दोन आमदाराची असली तरी एकटा बच्चू कडू शंभर आमदारांना पुरेसा आहे. जात, धर्म, बाजूला ठेवून आता खरी लढाई ही शेतकऱ्यांसाठी लढली पाहिजे, असे आवाहन बच्चू कडू यांनी केले आहे.
Amravati News अमरावती : माणसाच्या अंगात किती ताकद आहे. यापेक्षा, डाव कसा मारता येईल हे महत्त्वाचे आहे. आमची पार्टी फक्त दोन आमदाराची जरी असली तरी एकटा बच्चू कडू (Bacchu Kadu) शंभर आमदारांना पुरेसा आहे. आम्ही चितपट केल्याशिवाय राहत नाही. मग सभागृहात कोण बसला आहे. कोण नाही बसला आहे. याची चिंता आम्ही करत नाही. पण शेतकरी (Farmers) आमचा बाप आहे. हे आमच्या डोकात कायम राहते. त्यामुळे नेता आमचा बाप होऊ शकत नाही. आता आपण जात,धर्म, पंत, भेदभाव सगळे बाजूला ठेवून आता खरी लढाई ही शेतकऱ्यांसाठी लढली पाहिजे. मंजुरांसाठी लढता आली पाहिजे, असे आवाहन आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी शेतकऱ्यांना केले आहे. अमरावतीच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे भाष्य केले आहे.
शेतकऱ्यांपुढे आम्हाला शिंदे साहेब महत्वाचे नाही
आज सोयबिन, कापसाचे भाव पडले आहे. मात्र तुमचा तिवासा तालुका दुष्काळात आला नाही. सरकार मागून सरकार बदलले, मात्र धोरण काही बदलत नाही. त्यात अगदी कुठलाही पक्ष असू द्या. मग तो भाजप असो, काँग्रेस असे की राष्ट्रवादी, शिवसेना असो. शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी मी कायम सभागृहात बोलत असतो. आज जरी मी शिंदे साहेबांसोबत सत्तेत असलो तरी, शेतकऱ्यांपुढे आम्हाला शिंदे साहेब महत्वाचे नाही. आम्हाला शेतकरी फार महत्वाचा आहे. हे आम्ही विधानसभेत देखील अनेकदा बोलत आलो आहो. म्हणून आम्ही कायम शेतकऱ्यांसाठी काम करतो. त्यामुळे सत्ता आम्हाला महत्वाची नसल्याचे देखील बच्चू कडू म्हणाले.
हा तमाम शेतकरी अन् ग्रामीण जनतेचा अपमान
आम्ही जेव्हा ग्रामीण भागातले प्रश्न घेऊन सभागृहात उभे राहतो, त्यावेळी तुमच्या-आमच्यावर कशाप्रकारे अन्याय होतो हे आपण बघितले पाहिजे. केंद्र सरकारची पंतप्रधान आवास योजना शहरातील लोकांना अडीच लाखांचे घर देते. मात्र हीच योजना जेव्हा ग्रामीण भागात येते त्यावेळी तिची किंमत ही अडीच लाखांवरून सव्वा लाखांवर येते. विषय केवळ पैशांचा नाही. मात्र, हा तमाम शेतकरी आणि ग्रामीण जनतेचा अपमान आहे. हा अपमान आम्ही कधीही खपवून घेणार नाही. आगामी निवडणुकांमध्ये त्यामध्ये बदल केला नाही तर माझ्यासह सर्वांना हिसका दाखवावाच लागेल, मग ते कोणत्याही पार्टीचे असो. असा इशारा देखील बच्चू कडू यांनी यावेळी दिला.
योजना एक सारखी मात्र योजनेची रक्कम वेगवेगळी. असे का होतं, याचा विचार आपण केला पाहिजे. या मागचे एक मुख्य कारण म्हणजे आमच्यासारख्या राज्यकर्त्यांना हे माहिती आहे की, गावाकडचे राजकारण जाती-पातीत, धर्म-पंथात विभागले गेले आहे. तुमच्या हाती पक्षाचा, जातीचा झेंडा आहे. त्यामुळे लोकांना आपल्यावर अन्याय होतोय याची जाणीवच होत नाही. मी तर म्हणतो आपण प्रहार पक्षाकडून पडीक घरावर एक पाटी लावून शहराप्रमाणे अडीच लाख रुपयांची मागणीच केली पाहिजे. त्यासाठी प्रत्येक पडीक घरावर तशी पाटी लावली पाहिजे. आमचे मत जर हवे असेल तर समान न्याय आम्हाला मिळाला पाहिजे, असे देखील बच्चू कडू म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी एकत्र आले पाहिजे
मी आमदार आहे. मला अडीच लाख रुपये पगार आहे. अधिकाऱ्यांना लाख-लाख रुपये पगार असतो. मात्र पाच-पाच एकर शेत असून देखील शेतकऱ्यांना दहा हजार रुपये देखील मिळत नाही. ही वस्तूस्थिती आहे. जाती धर्मासाठी लोक एकत्र येतात, मात्र शेतीसाठी एकत्र येत नाही, ही शोकांतिका आहे. आता शेतकऱ्यांसाठी एकत्र आले पाहिजे. असे आवाहन देखील बच्चू कडू यांनी यावेळी केले.
इतर महत्वाच्या बातम्या