वाद टोकाला! बच्चू कडूंची रवी राणांविरोधात पोलिसात तक्रार दाखल
Amravati News Update : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Amravati News Update : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचलाय. रवी राणांविरोधात आमदार बच्चू कडू यांची अमरावतीमधील राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रवी राणांसोबत आरपारची लढाई लढायला मी तयार आहे. जिथे म्हणाल तिथे एकटा यायला तयार आहे असे बच्चू कडू यांनी तक्रार दाखल केल्यानंतर म्हटले आहे.
अलीकडेच रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले होते. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला होता. या आरोपानंतर बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. 1 नोव्हेंबर पर्यंत अमरावती येथील टाऊन हॉल याठिकाणी त्यांनी यावं आणि पुरावे द्यावे. जर पुरावे दिले तर मी त्यांच्या घरी भांडे घासेन, आणि पुरावे दिले नाहीत तर त्यांना कायमचा हिजडा घोषीत करणार असं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
"रवी राणा यांनी माझी बदनामी केली आहे. 20-20 वर्ष राजकीय करिअर उभं करायला गेली आहेत. मी पैसे घेऊन जर गुवाहाटीला गेलो असेल तर पैसे देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांनी पैसे दिले का? असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केलाय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील नोटीस पाठवणार आहोत. तुम्ही पैसे दिले असतील तर ते स्पष्ट करा अशी नोटीसीतून मागणी करणार असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. आमदार रवी राणा यांनी आरोप केले तर त्यांनी पुरावे द्यावे, हा लहान विषय नाही असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
रवी राणा यांनी केलेल्या आरोपांवरून बच्चू कडून चांगलेच आक्रमक झाले आहेत. बच्चू कडून यांनी एकेरी उल्लेख करत बच्चू कडू यांना आव्हान दिले आहे. "रवी राणा हा सत्तेत येऊन दुधही चाटतो आणि आमच्यावर आरोपही करतो. आरपारची लढाई करायची असेल तर मी त्याला तयार आहे. तो जिथे बोलवेल तिथे जाण्यास तयार आहे, अशी आक्रमक भूमिका बच्चू कडूंनी घेतली आहे.