एक्स्प्लोर
काँग्रेसच्या काळात तात्काळ कर्जमाफी : खा. आनंदराव अडसूळ
या सरकारला जास्त अक्कल आहे. यामुळे अद्यापही कर्जमुक्ती मिळालेली नाही. अशी टीका शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी केली.
अमरावती : काँग्रेसच्या काळात तात्काळ कर्जमाफी मिळत होती, असं वक्तव्य अमरावतीचे शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी केलं आहे. शिवसेनेच्या कर्जमुक्तीच्या आंदोलनावेळी भाजपवर टीका करताना अडसूळांनी काँग्रेसची बाजू घेतली.
या सरकारला जास्त अक्कल आहे. यामुळे अद्यापही कर्जमुक्ती मिळालेली नाही. मात्र काँग्रेसच्या काळात तात्काळ कर्जमुक्ती मिळत होती, अशी टीका खासदार आनंदराव अडसूळ यांनी केली.
दसऱ्यापूर्वी कर्जमाफी करा, राज्यभर शिवसेनेचे मोर्चे, वाशिममध्ये दोन मोर्चे
शेतकऱ्यांना दसऱ्याच्या आधी कर्जमाफी मिळावी अशी मागणी करत राज्यभरात शिवसेनेकडून मोर्चांचं आयोजन करण्यात आलं होतं. विदर्भातही या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. अमरावतीत आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली विशाल मोर्चा काढण्यात आला. वाशिममध्ये कर्जमाफीची मागणी करत शिवसेनेचेच दोन मोर्चे निघाले. खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा निघाला तर त्यापासून काही अंतरावर शिवसेना कार्यकर्त्यांचा दुसरा मोर्चा निघाला. या दोन मोर्चांनी वाशिममध्ये सेनेतील गटबाजी किती तीव्र झाली आहे, हेच दिसून आलं.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement