साहेबांचा गाव! 1400 लोकसंख्येच्या 'या' गावातील 100 जण सरकारी नोकरीत
गावातीलच उच्चशिक्षीत तरुणांनी जिल्हा परीषद शाळेतील विद्यार्थांच्या पालकांच्या भेटी घेणे त्यांना 'सुजान' शाळा उपक्रमाबाबत माहीती देणे आणि आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्यासाठी त्यांची मनधारणी करणे, त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेणं अशा स्वरूपात पहिल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुजान शाळा उपक्रमाची सुरुवात झाली.
अमरावती : जिल्ह्याच्या वरुड तालुक्यातील घोराड या 1400 लोकसंख्या असलेल्या गावामध्ये शेकडो अधिकारी घडले आहेत. या गावाचे तब्बल 100 जण हे सरकारी नोकरीत असून 28 जण लष्करात आहेत. मागील एक वर्षांपासून गावातील शाळा बंद असल्याने गावातील पदवीधर विद्यार्थी लहान मुलांना शाळेच्या प्रांगणात शिक्षणाचे धडे देत आहेत. लहान मुलांचं शिक्षण थांबू नये म्हणून या गावातील युवक गावाची परंपरा कायम राखण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
देशावर कोरोना महामारीचे संकट आल्यामुळे आणि कोरोना हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे देशात मार्च 2020 मध्ये सर्वत्र लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. लॉकडाऊन झाल्यामुळे लोकांना त्याचा मोठा फटका बसला. अमरावतीच्या वरुड तालुक्यातील घोराड गावातील तरूण-तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात गेले होते. ते तरूण विद्यार्थीसुद्धा आपापल्या स्वगृही परत आले. गावात परतल्यानंतर संघटीत होऊन तरुणांनी जिल्हा परीषद शाळेमधे शिक्षण घेत असलेल्या 130 विद्यार्थांना शिक्षणाचे अमुल्य ज्ञान अवगत होण्याच्या पवित्र उद्देशाने सुजान शाळा उपक्रमाची सुरुवात 20 जून 2020 ला केली आणि त्यासाठी त्यांनी सर्वांच्या सहकार्याने शाळेच्या दोन वर्गखोल्या प्रोजेक्टरच्या माध्यमातून 'सुजान' शाळा उपक्रमाचा उदय झाला.
गावातीलच उच्चशिक्षीत तरुणांनी जिल्हा परीषद शाळेतील विद्यार्थांच्या पालकांच्या भेटी घेणे त्यांना 'सुजान' शाळा उपक्रमाबाबत माहीती देणे आणि आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्यासाठी त्यांची मनधारणी करणे, त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेणं अशा स्वरूपात पहिल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुजान शाळा उपक्रमाची सुरुवात झाली. या शाळेमध्ये मुलांना शिक्षण घेणे सुलभ होण्याच्या दुष्टीने गृप तयार करण्यात आले. ज्यामध्ये इयता पहीली ते दुसरी, तिसरीच्या विद्यार्थांचा एक ग्रुप, इयत्ता 4 थी ते 5वी अशा विद्यार्थांचा दुसरा ग्रुप, इयता 6वी ते 7वी च्या विद्यार्थांचा तिसरा ग्रुप, इयता 8 वी ते 9वीच्या विद्यार्थांचा चौथा ग्रृप आणि इयता 10 वीच्या विद्यार्थांसाठी विषेश वर्ग घेण्यात आले. त्यामध्ये या सर्व विद्यार्थांचे वर्ग हे दररोज सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत चालणाऱ्या 'सुजान' शाळेमध्ये सकाळी 8 वाजता सर्वच विद्यार्थ्यांना (पिटी ) व्यायाम एक तासाचे सत्र त्यानंतर क्लासरुमध्ये वर्ग शिक्षकांच्या एक तासाचे पहिले लेक्चर त्यानंतर प्रत्येक लेक्चर 45 मिनिटांचे याप्रमाणे 'सुजान' शाळेचा उपक्रम सुरु झाला. या उपक्रमामुळे विद्यार्थांच्या बौद्धीक क्षमतेतसुद्धा वाढ झाली आहे. हे विषेश आणि या 'सुजान' शाळा उपक्रमाची र्सवत्र चर्चा होत असून उच्चशिक्षित विद्यार्थ्यांनी राबवलेला उपक्रम हा नक्कीच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे.
गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये प्राथमिक क्षिक्षण घेतलेले विद्यार्थी आज घडीला देशात विविध ठिकाणी शासकीय निमशासकीय विभागात अधिकारी कर्मचारी पदावर कार्यरत असून गावाच्या नावाचा उद्धार केला आहे. त्यामध्ये मेडीकल ऑफिसर, स्पेशल ऑडिटर, वैदयकीय अधिकारी, भारतीय वायुसेना, हायकोर्ट वकील, उपविभागीय अधिकारी, स्ट्रेझरी ऑफिसर, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनरक्षक, वैद्यकीय सेवा देणारे अधिकारी डॉक्टर, महसूल विभाग कर्मचारी, शिक्षक, कृषी अधिकारी, तलाठी, पोलीस, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहण विभागात कर्मचारी असे 100 च्या वर अधिकारी कर्मचारी या जिल्हा परीषद शाळेनं घडविले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :