Amravati Election : अमरावती पदवीधरमध्ये धीरज लिंगाडेंचा विजय, तब्बल 30 तास मतमोजणी, भाजपच्या रणजित पाटलांना मोठा धक्का
अमरावती पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पाटील (Dhiraj Lingade Patil) विजयी झाले आहेत. भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटलांना मोठा धक्का बसला आहे.
Amravati Division Graduate Constituency : अमरावती पदवीधर मतदारसंघात (Amravati Division Graduate Constituency) महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पाटील (Dhiraj Lingade Patil) यांचा विजय झाला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत लिंगाडे यांनी भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांचा पराभव केला आहे. रणजित पाटील यांचा पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत धिरज लिंगाडे यांना आघाडी मिळाली आहे. भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांचा पराभव झाला आहे. कोटा पूर्ण केला नाही पण मते अधिक असल्याने धिरज लिंगाडे हे विजयी झाले आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांनी लिंगाडे यांच्या विजयाची घोषणा केली आहे. धीरज लिंगाडे पाटील यांना 46 हजार 344 मते मिळाली. तर रणजित पाटील यांना 42 हजार 962 मते मिळाली आहेत. अत्यंत चुरशीच्या या लढतीत लिंगाडे पाटील यांनी अखेर बाजी मारली आहे. पराभवानंतर डॉ. रणजीत पाटील यांच्या अकोल्यातील जठारपेठ भागातील घर आणि कार्यालयात सन्नाटा पाहायला मिळत आहे. अकोल्यात डॉ. रणजीत पाटलांच्या अनपेक्षीत पराभवाचा कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे.
कोण आहेत धीरज लींगाडे...?
▪️जन्म तारीख: 10 एप्रिल 1972
▪️शिक्षण: BA. LLB
▪️1998 ला नगरसेवक म्हणून पहिल्यांदा काँग्रेसकडून विजयी
▪️2010 ला शिवसेना बुलढाणा जिल्हाप्रमुख
▪️पुढे शिवसेनेमध्ये कार्यरत
▪️2023 ला विधानपरिषद निवडणूकीआधी काँग्रेसमध्ये प्रवेश
▪️पत्नीचे नाव: सौ पद्मजा धीरज लिंगाडे
▪️मुलांची नावे: वेदांत व सोहम
▪️वडील: स्व. रामभाऊ लिंगाडे, माजी गृहराज्यमंत्री 1978
▪️विधान परिषद आमदार, अकोला बुलढाणा वाशिम (स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ) 1978 ते 1983
▪️स्व. रामभाऊंनी 1999ला शरद पवार यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
▪️धीरज लिंगाडेंना सामाजिक व मित्र जमवण्याची प्रचंड आवड. संगीत व बॅडमिंटनची आवड
चालवत असलेल्या संस्था:
▪️स्व. रामभाऊजी लिंगाडे सहकारी पतसंस्था, बुलढाणा ( 1994 पासून). आता 7 शाखा
▪️आधी यशवंत डी. एड. कॉलेज 1969 पासून तर आता त्याच कॉलेजचे नाव स्व. रामभाऊजी लिंगाडे डीटीएड कॉलेज.
▪️2010 पासून बी. एड. कॉलेज
▪️2008 पासून पॉलिटेक्निक कॉलेज
▪️2014 पासून बुलढाणा केंब्रिज स्कूल (सीबीएससी पॅटर्न)
▪️2022 पासून डी. फार्मसी काॉलेज
महत्त्वाच्या बातम्या:
Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबेंचा दणदणीत विजय; काय आहेत तांबेंच्या विजयाची कारणं?