Dilip Walse Patil : जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊनच शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करा : गृहमंत्री
Dilip Walse Patil : शिवाजी महाराजांचा पुतळा जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊनच उभारा असं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केलं आहे.
Dilip Walse Patil : शिवाजी महाराजांचा पुतळा जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊनच उभारा असं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केलं आहे. अमरावतीत सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चर्चेचा विषय बनला आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा राजापेठ उड्डाणपूलावरच बसवणार असल्याचं खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी सांगितलं आहे. यावर आता गृहमंत्र्यांनी परवानगी न घेता पुतळा उभारणाऱ्यांना इशारा देत म्हटलं आहे की, 'जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच पुतळा उभारा. पुतळा उभा केल्यानंतर त्याची सुरक्षितता महत्वाची आहे.' प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला आहे.
शिवजयंती साजरी करताना नियमांचं उल्लंघन करु नये असं आवाहन वळसे-पाटील यांनी केलं आहे. त्यांनी पुढे म्हटलं आहे की, 'शिवाजी महाराजांवरील प्रेम मी समजू शकतो. मात्र जे नियम घालण्यात आले आहेत त्यांचं पालन करावं. कोरोनाशी लढताना केंद्र सरकारकडून बंधनं घालण्यात आली आहेत. त्यामुळे केवळ हिंदूंना टार्गेट करण्यात येतं आहे, हे म्हणण चुकीचं आहे. समाजात अस्वस्थता निर्माण करण्याचं काम होत आहे.'
'मराठा आरक्षणाचा प्रश्न हा कोर्टात प्रलंबित'
मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, 'मराठा आरक्षणाचा प्रश्न कोर्टात प्रलंबित आहे. कायदा आणि सुव्यस्था सर्वांनी पाळायला हवी. मंत्र्यांच्या आणि पक्षांच्या कार्यालयांवर आंदोलनं होत आहेत हे चुकीचं आहे.' दरम्यान संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेसंदर्भात त्यांनी म्हटलं आहे की, 'संजय राऊत यांनी घोषणा केली. त्यांचं नेमक काय म्हणणं आहे हे त्याच्या पत्रकार परिषदेनंतर स्पष्ट होईल. त्यानंतर बोलणं योग्य होईल.'
महाराजांचा पुतळा राजापेठ उड्डाणपूलावरच : नवनीत राणा
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजापेठ उड्डाणपूलावरच बसवणार असल्याचं खासदार नवनीत राणा यांनी ठासून सांगितलं आहे. कितीही दबाव टाकला आणि जेलमध्ये टाकलं तरीही महाराजांचा पुतळा शिवजयंतीच्या आधी स्थापन होईल असा इशाराच नवनीत राणा यांनी दिला आहे.
पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील अपघातात सोलापूर येथील काँग्रेस नेत्यासह चार ठार, तीन जखमी
- Hijab Controversy : कर्नाटक हिजाब प्रकरणी आज सुनावणी, तीन सदस्यीय खंडपीठ करणार सुनावणी
- Coronavirus Cases Today : दिलासादायक! कोरोनाची तिसरी लाट ओसरली; गेल्या 24 तासांत 27 हजार 409 नवे कोरोनाबाधित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha