Thackeray Faction Vs BJP Activists Controversy At Rajkot Fort : त्यांना वाटत असेल, पण आम्ही कोंबड्या वगैरे आणल्या नाहीत, राजकोट किल्ल्यावर राडा सुरु असताना आदित्य ठाकरेंचा बोचरा वार
महाविकास आघाडीचे कार्यकर्ते राजकोटवर पोहोचले असतानाच विद्यमान खासदार नारायण राणे माजी खासदार निलेश राणे यांच्यासह पुतळ्याची ठिकाणी पाहणी करण्यासाठी आले.
Thackeray Vs BJP Activists Controversy At Rajkot Fort : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा फक्त आठ महिन्यांमध्ये कोसळल्यानंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये एकच आक्रोश सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीकडून मालवणमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. मात्र हा मोर्चा होण्यापूर्वीच राजकोटवर कट्टर विरोधक खासदार नारायण राणे विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा सामना रंगला. एकमेकांवर धावून जाण्याचा प्रकार सुद्धा घडला.
एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार
महाविकास आघाडीचे कार्यकर्ते राजकोटवर पोहोचले असतानाच खासदार नारायण राणे माजी खासदार निलेश राणे यांच्यासह पुतळ्याची ठिकाणी पाहणी करण्यासाठी आले. या ठिकाणी नारायण राणे यांनी एबीपी माझाच्या प्रतिनिधीला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान हा सर्व प्रकार सुरू असतानाच ठाकरे गटाचे आणि भाजप समर्थक आमने सामने आल्याने एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार सुद्धा घडला. एकमेकांच्या कार्यकर्त्यांना ओढून मारण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे पुतळा पाहणीचा जो कार्यक्रम होता तो बाजूला पडून एकमेकांच्या कार्यकर्त्यांवर धावून जाण्याचा प्रकार घडल्याने या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
त्यांना वाटत असेल आम्ही कोंबड्या वगैरे आणल्या असतील
हा राडा सुरु असताना ठाकरे गटाकडून सुद्धा पोलिसांना अल्टिम देण्यात आला. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी जर आम्हाला पंधरा मिनिटांमध्ये रस्ता करून दिला नाही, तर शिवसेना रस्त्यावरची संघटना आहे आम्ही सुद्धा दाखवून देऊ असा इशारा दिला. यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर बोचरा वार केला. त्यांना वाटत असेल आम्ही कोंबड्या वगैरे आणल्या असतील, पण तसं काही नाही म्हणत एक प्रकारे नारायण राणे यांना राजकोट किल्ल्यावर बोचरा वार करण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी, नारायण राणे आणि निलेश राणे राजकोटवर पाहणी करत असतानाच आदित्य ठाकरे यांचेही आगमन झाले. यावेळी माजी खासदार विनायक राऊत सुद्धा होते. त्यामुळे ठाकरे आणि नारायण राणे गट आमने-सामने आल्याने दोन्हीकडील कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. यावेळी नारायण राणे यांच्या समर्थनार्थ सुद्धा घोषणा देण्यात आल्या. घोषणांचा प्रकार सुरू असतानाच पोलीस दोन्हीकडील कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत होते. मात्र या ठिकाणी पोलीस बळ अपूर्ण ठरल्याचे दिसून आले.
इतर महत्वाच्या बातम्या