एक्स्प्लोर

Video : Omicron Variant : ओमायक्रॉन खरंच एवढा धोकादायक आहे का? सध्यातरी व्हेरियंटवर एकच पर्याय! 

बाहेरील देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. देशांतर्गतसुद्धा योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. ओमायक्रॉनच्या व्हेरियंटच्या प्रसाराचा वाढता वेग पाहता नागरिकांनी खबरदारी घेतली पाहिजे.

मुंबई : जगभरात दहशत माजविणारा ओमायक्रॉन (Omicron Variant) आता भारतातही पसरला आहे. भारतात आता ओमायक्रॉनचे 21 रूग्ण झाले आहेत. तर महाराष्ट्रातही ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रूग्णांची संख्या 8 वर पोहोचली आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरासह राज्यातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ओमायक्रॉनचा वाढता प्रसार पाहता काय काळजी घेतली पाहिजे, याबाबत राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांच्यासोत एबीपी माझाने संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी, ओमायक्रॉनवर सध्या फक्त सर्वेक्षण हा एकच पर्याय असल्याचे सांगितले. 

दक्षिण आफ्रिकेत प्रथम आढळलेला ओमायक्रॉन आता जगभरात पोहोचला आहे. त्यामुळे बाहेरील देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. शिवाय देशांतर्गतसुद्धा योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. ओमायक्रॉनच्या व्हेरियंटच्या प्रसाराचा वाढता वेग पाहता नागरिकांनी खबरदारी घेतली पाहिजे. त्याबाबत बोलताना डॉ. आवटे यांनी सांगितले की, या व्हेरियंटचा प्रसार अत्यंत वेगाने होत आहे. परंतु, त्याचे स्वरूप फार गंभीर नाही. काल पुण्यात सापडलेल्या सातही रूग्णांची लक्षणे गंभीर स्वरूपाची नाहीत. तर राज्यातील आठही ओमायक्रॉनच्या रूग्णांना जास्त त्रास जाणवत नाही. या सर्वांचीच प्रकृती स्थिर आहे. 

घाबरण्याचे कारण नाही!
ओमायक्रॉनचा वाढता प्रसार पाहता लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, डॉ. आवटे सांगतात की, नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये. परंतु, कोरोना (Coronavirus) अजून आपल्या आसपास आहे. तो पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे लोकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. मास्कचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. शिवाय राज्य सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करावे. 

ओमाक्रॉनवर एकच पर्याय 
बाहेरील देशातून येणाऱ्या प्रवाशांवर कडक निर्बंध घालण्यासह त्यांची माहिती घेऊन आरोग्य यंत्रणा सतत त्यांच्या संपर्कात आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रूग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे. इतर देशातून येणाऱ्या प्रवाशांकडे राज्य सरकारचं लक्ष आहे. प्रत्येकाची तपासणी केली जात आहे. मागील महिन्याभरात इतर देशातून भारतात आलेल्या प्रवाशांचा देखील राज्य सरकार डेटा गोळा करत आहे. परंतु, आताची परिस्थिती पाहता फक्त सर्वेक्षण हा एकच पर्याय सध्या राज्य सरकारसमोर असल्याचे डॉ. आवटे सांगतात. 

संबंधित बातम्या 

Omicron Variant : देशात 21 ओमायक्रॉन बाधित ! प्रशासन सतर्क, संसदेच्या आरोग्य समितीनं बोलावली बैठक

नवा व्हेरियंट पुन्हा उद्योगांचं आर्थिक गणित बिघडवणार? उद्योजकांसमोर चिंतेचे काळे ढग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Congress : नाशकात काँग्रेसमधील गटबाजी उघड, आमदार हिरामण खोसकरांचा फोटो होर्डिंग्जवरून गायब, चर्चांना उधाण
नाशकात काँग्रेसमधील गटबाजी उघड, आमदार हिरामण खोसकरांचा फोटो होर्डिंग्जवरून गायब, चर्चांना उधाण
Mood of the Nation 2024: आज निवडणुका झाल्या तर, निकालात काँग्रेसची ताकद वाढणार? भाजपला किती जागा मिळणार? सर्वेक्षणाचा धक्कादायक खुलासा
आज निवडणुका झाल्या तर, निकालात काँग्रेसची ताकद वाढणार? भाजपला किती जागा मिळणार? सर्वेक्षणाचा धक्कादायक खुलासा
Bigg Boss Marathi Season 5 Abhijeet Sawant Nikki Tamboli :  निक्कीसाठी अरबाज झाला पझेसिव्ह; पण हिचं भलतंच काहीतरी, अभिजीतसोबतच्या गप्पांमध्ये उडवली खिल्ली
निक्कीसाठी अरबाज झाला पझेसिव्ह; पण हिचं भलतंच काहीतरी, अभिजीतसोबतच्या गप्पांमध्ये उडवली खिल्ली
Pune Crime News: 'तू मला आवडतेस' शाळेतील स्कूल व्हॅन चालकाचे विद्यार्थिनीला इंस्टाग्रामवर मेसेज; मनसैनिकांनी दिला चोप, पुण्यातील घटना
'तू मला आवडतेस' शाळेतील स्कूल व्हॅन चालकाचे विद्यार्थिनीला इंस्टाग्रामवर मेसेज; मनसैनिकांनी दिला चोप, पुण्यातील घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 23 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSainath Paradhi Palghar : महाराष्ट्राच्या साईनाथ पारधीने गाजवलं जॉर्डनSugar Factory Maharashtra : सत्ताधाऱ्यांच्या 17 साखर कारखान्यांना कर्ज वितरणाला हायकोर्टाची मनाईTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :23 ऑगस्ट 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Congress : नाशकात काँग्रेसमधील गटबाजी उघड, आमदार हिरामण खोसकरांचा फोटो होर्डिंग्जवरून गायब, चर्चांना उधाण
नाशकात काँग्रेसमधील गटबाजी उघड, आमदार हिरामण खोसकरांचा फोटो होर्डिंग्जवरून गायब, चर्चांना उधाण
Mood of the Nation 2024: आज निवडणुका झाल्या तर, निकालात काँग्रेसची ताकद वाढणार? भाजपला किती जागा मिळणार? सर्वेक्षणाचा धक्कादायक खुलासा
आज निवडणुका झाल्या तर, निकालात काँग्रेसची ताकद वाढणार? भाजपला किती जागा मिळणार? सर्वेक्षणाचा धक्कादायक खुलासा
Bigg Boss Marathi Season 5 Abhijeet Sawant Nikki Tamboli :  निक्कीसाठी अरबाज झाला पझेसिव्ह; पण हिचं भलतंच काहीतरी, अभिजीतसोबतच्या गप्पांमध्ये उडवली खिल्ली
निक्कीसाठी अरबाज झाला पझेसिव्ह; पण हिचं भलतंच काहीतरी, अभिजीतसोबतच्या गप्पांमध्ये उडवली खिल्ली
Pune Crime News: 'तू मला आवडतेस' शाळेतील स्कूल व्हॅन चालकाचे विद्यार्थिनीला इंस्टाग्रामवर मेसेज; मनसैनिकांनी दिला चोप, पुण्यातील घटना
'तू मला आवडतेस' शाळेतील स्कूल व्हॅन चालकाचे विद्यार्थिनीला इंस्टाग्रामवर मेसेज; मनसैनिकांनी दिला चोप, पुण्यातील घटना
Nashik Dengue Update : नाशिककरांनो काळजी घ्या! शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या 900 पार, मनपाची आरोग्य यंत्रणा कोलमडली
नाशिककरांनो काळजी घ्या! शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या 900 पार, मनपाची आरोग्य यंत्रणा कोलमडली
Kaun Banega Crorepati 16 :   'केबीसी'मध्ये ब्रेन ट्युमरग्रस्त नरेशी मीना नाही झाली करोडपती, तुम्हाला माहित आहे का या प्रश्नाचे उत्तर
'केबीसी'मध्ये ब्रेन ट्युमरग्रस्त नरेशी मीना नाही झाली करोडपती, तुम्हाला माहित आहे का या प्रश्नाचे उत्तर
Vikhroli Accident: भरधाव वेगात जीव गमावला; विक्रोळीतील भीषण अपघातात दोन जीवलग मित्रांवर काळाचा घाला, गाडीचा चक्काचूर
भरधाव वेगात जीव गमावला; विक्रोळीतील भीषण अपघातात दोन जीवलग मित्रांवर काळाचा घाला, गाडीचा चक्काचूर
Marathi Serial Updates Durga : सुरू होताच संपली 'अंतरपाट' मालिका! नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला
सुरू होताच संपली 'अंतरपाट' मालिका! नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Embed widget