Maharashtra Political Crisis Live: उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण पुन्हा मिळणार? सुप्रीम कोर्टात सर्वात मोठी सुनावणी
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाप्रकरणी आज सुुप्रीम कोर्टात दोन महत्त्वाच्या सुनावण्या पार पडणार आहे. या दोन्ही सुनावण्यांचे प्रत्येक अपडेटस एका क्लिकवर
LIVE
Background
नवी दिल्ली : शिवसेना आणि ठाकरे गट यांच्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण आजपासून सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाने दोन याचिका सु्प्रीम कोर्टात दाखल केल्या होत्या. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं असल्याचा निकाल दिला होता. या निकालाविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होणाराय. तर तर 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी तातडीने सुनावणी घ्यावी, यासाठी ठाकरे गटाने याचिका दाखल केली होती. त्यावरही सुनावणी होणार आहे
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात
दरम्यान सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागला. शिवाय केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरण्याचा अधिकार शिंदे गटाला दिला. त्यानंतर ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाच्या याबाबतच्या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. सत्तासंघर्षावरील याचिकेवर सुनावणी सुरु असतानाच ही याचिका दाखल झाली होती. पण त्यावर सुनावणी झाली नव्हती. आज या याचिकेवर सुनावणी होईल.
विधानसभा अध्यक्षांविरोधात ठाकरे गटाची याचिका
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी गेल्या वर्षी बंडखोरी केली होती. त्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी न घेतल्याने ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्षांना लवकर घेण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी याचिकेत केली होती. यापूर्वी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावून दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले होते. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली होती.
सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठासमोर सुनावणी होणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट यामध्ये पडणार का, या सुनावणीत नेमकं काय होणार, कोर्ट काही निर्देश देणार का याची उत्सुकता लागली आहे.
Anil Desai : सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांची प्रतिक्रिया
Anil Desai : डेडलाईन आणि सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचा आदर करायला हवा - अनिल देसाई
Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांना खडेबोल
Supreme Court: 'आमदार अपात्रतेबाबत तातडीने निर्णय घ्या, न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवा', सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांना निर्देश
Supreme Court: ठाकरे गटाच्या शिवसेना पक्ष, चिन्हाच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
Supreme Court: ठाकरे गटाच्या शिवसेना पक्ष, चिन्हाच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली आहे. तीन आठवड्यांनी शिवसेना पक्ष, चिन्हाच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
Kapil Sibal: कोर्टाची तारीख आली तेव्हा चार दिवस दिखावा म्हणून सुनावणी ठेवली : कपिल सिब्बल
Kapil Sibbal: सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षांचा नवा अध्याय सुरू झाला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या याचिकेवर सुनावणी झाली. कोर्टाची तारीख आली तेव्हा चार दिवस दिखावा म्हणून सुनावणी ठेवली, असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी केला आहे.
Maharashtra Politics: महाराष्ट्राची दोन्ही प्रकरणं सुप्रीम कोर्टात दुपारनंतरच येणार
Maharashtra Politics: महाराष्ट्राची दोन्ही प्रकरणं सुप्रीम कोर्टात लंच ब्रेकनंतक येणार आहे. दुपारी दोन नंतर पुन्हा कामकाज सुरू होणार आहे.