![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shivjayanti 2023: यंदाची शिवजयंती आग्रा किल्ल्यात साजरी होणार, पुरातत्व विभागाची अखेर परवानगी
आग्रा किल्ल्यात इतर सांस्कृतिक कार्यक्रमं साजरे करण्यासाठी परवानगी दिली जात, मग शिवजयंतीला परवानगी का नाकारली जातेय असा प्रश्न विचारत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
![Shivjayanti 2023: यंदाची शिवजयंती आग्रा किल्ल्यात साजरी होणार, पुरातत्व विभागाची अखेर परवानगी Shivjayanti 2023 Shiv Jayanti will be celebrated in the Agra Fort permission from the Archeology Department Shivjayanti 2023: यंदाची शिवजयंती आग्रा किल्ल्यात साजरी होणार, पुरातत्व विभागाची अखेर परवानगी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/15/13368996438433a9ee5cde5ead6d6590167645793642693_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shivjayanti 2023: आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यास अखेर पुरातत्व खात्याने परवानगी दिली आहे. आग्रा किल्ल्यातील (Agra Fort) 'दिवाण-ए-आम'मध्ये शिवजयंती साजरी करायला पुरातत्व खात्याने (Archaeological Survey of India) परवानगी दिली आहे. या आधी आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यास नाकारण्यात आली होती. सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली जाते मग शिवजयंतीबाबत भेदभाव का असा सवाल उपस्थित करत संतप्त शिवप्रेमींनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर आता पुरातत्व खात्याने ही परवानगी दिली आहे. त्यामुळे शिवप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.
विनोद पाटील यांच्या अजिंक्य देवगिरी फौंडेशन आणि महाराष्ट्र सरकारकडून आग्रा किल्ला परिसरात यंदा शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे 11 नोव्हेंबर 2022 पासून या परवानगीसाठी प्रयत्न केले जात होते. वेळोवेळी पाठपुरावा करुनही पुरातत्व खात्याकडून शिवजयंती साजरी करण्यास परवानगी नाकरण्यात येत होती. विशेष म्हणजे याच आग्र्याच्या किल्ल्यामध्ये यापूर्वी आगाखान पुरस्कार कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आली होती. एवढंच नाही तर अदनान सामीच्या कॉन्सर्टलाही परवानगी देण्यात आली होती. ज्यांचा ऐतिहासिक संबध त्या किल्ल्याशी नाही अशांना परवानगी दिली जाते. मग त्या किल्ल्याशी ऐतिहासिक संबध असलेल्या शिवाजी महाराजांच्या जयंतीलाच परवानगी का नाकारली जातेय असा सवाल अंजिक्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी केला होता.
विनोद पाटील यांच्या प्रयत्नानंतर आता भारतीय पुरातत्व खात्याने आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे केवळ राज्यातीलच नव्हे तर देशभरातील शिवप्रेमींकडून आनंद व्यक्त केला जात आहे.
सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज संभाजी यांना आग्रात नजरकैदेत ठेवलं होतं. या दोघांनाही त्या ठिकाणी मारण्याचा कट औरंगजेबानं आखला होता. त्यानंतर शिवाजी महाराजांनी मोठ्या शिताफीनं आग्य्रातून सुखरूप सुटका करुन घेतली. या घटनेला मराठ्यांच्या इतिहासात (Maratha History) अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे या किल्ल्यामध्ये शिवजयंतीचा भव्य सोहळा साजरा व्हावा अशी अनेक शिवप्रेमींची इच्छा होती. ती आता पूर्ण होत आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)